मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रुटी खीरा (संमिश्र फळांसह रिकोटा राईस पुडिंग)

Photo of Fruity Khira (Ricotta Rice Pudding with Assorted Fruits) by sweta biswal at BetterButter
1170
5
0.0(0)
0

फ्रुटी खीरा (संमिश्र फळांसह रिकोटा राईस पुडिंग)

Apr-25-2016
sweta biswal
10 मिनिटे
तयारीची वेळ
80 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • ओरिसा
  • सिमरिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. दीड लिटर संपूर्ण दूध (किंवा 1 लिटर दूध आणि 2/3 वाटी रिकोटा चीज)
  2. अर्धा कप कंडेन्स्ड मिल्क
  3. 7-8 काजू
  4. 2 मोठे चमचे पिस्त्याच्या चकत्या
  5. 1 लहान चमचा व्हिनेगर
  6. 1-2 लहान चमचे साखर
  7. चिमूटभर केशर
  8. अर्धा लहान चमचा तूप
  9. 2 वाट्या विविध प्रकारची फळे (अंजीर, किवी, सफरचंद, अननस, कलिंगड, द्राक्षे)

सूचना

  1. एका पॅनमध्ये अर्धा लिटर दूध उकळवा. ते पूर्ण उकळले की त्यात व्हिनेगर घाला (1/4 कप पाण्यात पातळ करून).
  2. पुंन्हा 4-5 मिनिटे उकळवा. ज्यामुळे छेना/रिकोटा चीज (दुधाचा घट्ट भाग) हिरव्या पाण्यापासून वेगळे होईल. हे पाणी गाळून घ्या.
  3. वाहत्या पाण्यात छेना/रिकोटा चीज धुऊन घ्या, ज्यामुळे त्यात राहिलेले व्हिनेगर वाहून जाईल. छेना/रिकोटा चीजमधून राहिलेले पाणी पिळून काढून टाका आणि थंड होण्यासाठी ठेवा.
  4. पॅनमध्ये थोडे तूप गरम करा. त्यात काजू गुलाबी रंगाचे होईपर्यंत तळा. त्यांना पॅनमधून काढून बाजूला ठेवा. आता पिस्त्याच्या चकत्या घालून 30 सेकंद तळा आणि पॅनमधून काढून घ्या.
  5. एक जाड तळाची कढई घ्या. त्यात उरलेले दूध उकळवा. दूध उकळवून निम्मे करा.
  6. आता त्यात कंडेन्स्ड मिल्क, केशर, साखर आणि तळलेले काजू घाला. छेना/रिकोटा चीज घालण्याअगोदर 10 मिनिटे उकळावा.
  7. मिश्रण घट्ट (रबडीसारखे घट्ट) होईपर्यंत अधूनमधून हलवत रहा. आता त्यात पिस्त्याच्या चकत्या घाला आणि गॅसवरून खाली उतरावा आणि बाजूला ठेवा.
  8. वाढण्याअगोदर 3-4 तास फ्रीजमध्ये ठेऊन थंड करा.
  9. एका वाडग्यात चिरलेली फळे घ्या आणि त्यावर मुक्तपणे खीरा/रिकोटा चीज पसरवा. आत्ता त्याचा स्वाद घ्या!

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर