BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Kadali Manja Tarkari (Banana Stem Curry)

Photo of Kadali Manja Tarkari (Banana Stem Curry) by sweta biswal at BetterButter
331
11
0(0)
0

कडली मांजा तरकारी (बनाना स्टेम करी)

Apr-25-2016
sweta biswal
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • ओरिसा
 • सिमरिंग
 • सौटेइंग
 • साईड डिश
 • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

 1. 8 इंच लांब केळाचे खोड
 2. 1 मध्यम बटाटा
 3. 1 मध्यम कांदा
 4. 1/3 लहान चमचा पंचा फुटाणा
 5. 3 सुक्या लाल मिरच्या
 6. 1 लहान चमचा धणे
 7. अर्धा लहान चमचा जिरे
 8. 1 इंच दालचिनी
 9. 2 हिरवे वेलदोडे
 10. 2 तमालपत्र
 11. दीड लहान चमचा आले-लसणाची पेस्ट
 12. 3-4 लसणाच्या पाकळ्या
 13. अर्धा लहान चमचा हळद
 14. 5 लहान चमचे तेल
 15. मीठ स्वादानुसार

सूचना

 1. केळाच्या खोडाला स्वच्छ करून त्याचे पातळ काप करा.
 2. एक वर्तुळ कापल्यानंतर, जेव्हा त्याला राहिलेल्या भागापासून वेगळे करीत असतो, तेव्हा आपल्याला रेषा किंवा तंतु जाणवतात. तुमचे बोटे गोलाकार दिशेत फिरवा आणि शक्य तितक्या रेषा काढून टाका.
 3. त्या वर्तुळांचे लहान तुकडे करा. मीठ आणि हळद पूड घालून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवा.
 4. अर्ध्या तासानंतर, केळीच्या खोडाच्या तुकड्यांना दोन्ही हाताने पिळून सर्व पाणी काढून टाका.
 5. कांद्याचे पातळ आणि लहान तुकडे करा. बटाट्याचे लहान तुकडे करा.
 6. दोन लाल मिरच्यांबरोबर लसणाच्या पाकळ्या, वेलदोडे, दालचिनी, जिरे आणि धणे वाटून पेस्ट करा.
 7. एका कढईत 5 लहान चमचे तेल गरम करा. त्यात पंचा फुटाणा, तमालपत्र आणि 1 लाल मिरची घाला. नंतर त्यात चिरलेला कांदा घाला आणि बदामी होईपर्यंत परता.
 8. आले-लसणाच्या पेस्टबरोबर मसाला पेस्ट आणि हळद घाला आणि त्याचा तीव्र वास जाईपर्यंत परता. नंतर बटाट्याचे तुकडे घालून 5 मिनिटे परता.
 9. पाणी काढून ठेवलेल्या केळींच्या खोडाचे तुकडे घाला आणि जवळपास शिजेपर्यंत हलवित तळा.
 10. केळीच्या खोडाचे काप शिजण्यासाठी किती वेळ लागतो हे त्यांच्या मऊपणावर अवलंबून आहे. जर ते अतिशय मऊ असतील तर 8-9 मिनिटात शिजतील, परंतु जर ते फारसे मऊ नसतील, तर शिजण्यासाठी 15-16 मिनिटे लागतील.
 11. अर्धा कप पाणी घाला आणि झाकण घट्ट लावून 5 मिनिटे शिजवा.
 12. आचेवरून खाली उतरावा आणि भाताबरोबर गरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर