BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Khaman Dhokala

Photo of Khaman Dhokala by Nayana Narendra at BetterButter
1
9
5(2)
0

Khaman Dhokala

May-12-2018
Nayana Narendra
240 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Khaman Dhokala कृती बद्दल

खुप गृहीणींची तक्रार असते की माझा ढोकळा फुगत नाही. माझी ही रेसीपी करून बघा. १०१% ढोकळा फुगणार. चला तर पाहू याची रेसिपी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. बेसन २ कप
  2. दही १ कप
  3. हळद १/४ टीस्पून
  4. लिंबूरस १ टीस्पून
  5. खायचा सोडा १ टीस्पून
  6. मीठ
  7. पाणी १/२ कप (आवश्यकतेनुसार)
  8. तेल फोडणीसाठी
  9. हिरव्या मिरच्या २-३
  10. हिंग १/४ टीस्पून
  11. मोहरी १/४ टीस्पून
  12. कढीपत्ता ७-८ पाने
  13. साखर १ टीस्पून
  14. पाणी १/२ कप

सूचना

  1. बेसन व दही मिक्स करून ४-५ तास झाकून ठेवा.
  2. ढोकळा थाळीला तेल लावून भांडे बाजूला ठेवा.
  3. ढोकळ्याच्या भांड्यात पाणी घालून गॅसवर ठेवा.
  4. बेसनाच्या मिश्रणात पाणी, लिंबू रस, मीठ, सोडा घाला.
  5. एकाच दिशेने नीट मिक्स करा.
  6. बेसनाचे मिश्रण ढोकळा थाळीत ओता.
  7. ढोकळा थाळी ढोकळ्याच्या भांड्यात ठेवा.
  8. ७-८ मिनिटे वाफवा.
  9. आता एका भांडयात तेल गरम करुन हिंग, हळद, मोहरी, कढीपत्ता, मिरच्या ची फोडणी करा.
  10. या फोडणीत पाणी घाला.
  11. साखर घाला.
  12. हे पाणी ढोकळ्यावर ओता.
  13. तयार आहे तुमचा स्वादिष्ट खमण ढोकळा.
  14. बारीक शेव व डांळिबाच्या दाण्याने सजवा.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anvita Amit
May-12-2018
Anvita Amit   May-12-2018

superb

samina shaikh
May-12-2018
samina shaikh   May-12-2018

super

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर