काबूळी चना रस्सा | Kabuli Chana rassa/ Curry Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kabuli Chana rassa/ Curry recipe in Marathi,काबूळी चना रस्सा, Aarti Nijapkar
काबूळी चना रस्साby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  35

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

काबूळी चना रस्सा recipe

काबूळी चना रस्सा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kabuli Chana rassa/ Curry Recipe in Marathi )

 • काबूळी चना १ वाटी
 • लवंग २
 • काळीमिरी २
 • दालचिनी १/२ इंच
 • वेलदोडा १
 • आलं १/२ इंच
 • पाणी ३ ते ४ ग्लास
 • तेल २ मोठे चमचे
 • मोहरी १/४ लहान चमचा
 • जिरे १/२ लहान चमचा
 • हिंग १/२ लहान चमचा
 • कडीपत्ते ७ ते ८ पाने
 • कांदा पेस्ट १ लहान वाटी
 • टमाटर पेस्ट १/२ लहान वाटी
 • आलं लसूण पेस्ट १ मोठा चमचा
 • खोबऱ्याची पेस्ट २ मोठे चमचे
 • कोथिंबीर पुदीना मिरची पेस्ट १ मोठा चमचा
 • लाल तिखट १ मोठा चमचा
 • गरम मसाला १ लहान चमचा
 • धने पावडर १ लहान चमचा
 • जिरे पावडर १ लहान पावडर
 • हळद १/२ लहान चमचा
 • मीठ चवीनुसार
 • कोथिंबीर चिरलेली १ मोठा चमचा

काबूळी चना रस्सा | How to make Kabuli Chana rassa/ Curry Recipe in Marathi

 1. काबूळी चना ४ ते ५ तास भिजवून घ्या मग पाण्याने धुवून त्यात लवंग , काळीमिरी , दालचिनी , वेलदोडा, आणि आले घाला त्यात पाणी घालून ४ ते ५ कुकर मध्ये शिट्या होऊ द्या शिकवून घ्या
 2. एक पातेल्यात तेल तापवून घ्या त्यात मोहरी जिरे कडीपत्ता घाला तडतडले की हिंग घाला
 3. आता कांद्याची पेस्ट घाला व परतवून घ्या टमाटर पेस्ट , कोथिंबीर पेस्ट , आलं लसूण पेस्ट मीठ व हळद घालून व्यवस्थित तेलात भाजून घ्या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत भाजा
 4. मग खोबऱ्याची पेस्ट घालून परतवून घ्या
 5. आता सर्व मसाले घाला व परतवून घ्या मसल्याना तेल सुटले पाहिजे
 6. शिजवलेले काबूळी चने घालून परतवून घ्या
 7. शिजवलेले काबूळी चण्यातील पाणी घाला हवं असेल तर गरजेनुसार अजून पाणी घालू शकता
 8. सर्व मिश्रण एकजीव करून घ्या मीठ तिखट चव चाखून बघा आणि २ ते ३ उकळी येऊ द्या
 9. गरमागरम काबूळी चने रस्सा तयार आहे चिरलेली कोथिंबीर घाला व गॅस बंद करा चपाती , भाकरी , भात , पावासोबत खाऊ शकता
 10. लाल तरीदार रस्सा हवा असेल तर पाणी गरम घालावे

My Tip:

लाल तरीदार रस्सा हवा असेल तर पाणी गरम घालावे

Reviews for Kabuli Chana rassa/ Curry Recipe in Marathi (0)