Home / Recipes / Misal rassa

Photo of Misal rassa by Ajinkya Shende at BetterButter
576
4
0.0(0)
0

Misal rassa

Feb-11-2018
Ajinkya Shende
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Breakfast and Brunch

Ingredients Serving: 4

  1. बारीक कापलेले ३ मोठे कांदे
  2. बारीक कापलेला १ मोठा टोमॅटो
  3. अर्धी वाटी भाजलेलं सुकं खोबरं
  4. अर्धी वाटी तेल
  5. ७-८ पाकळ्या लसुण
  6. छोटा तुकडा आलं
  7. २ लवंग,२ काळी मीरी,छोटा तुकडा दालचीनी
  8. लाल मिर्ची पावडर १ चमचा
  9. काळा किंवा गोडा मसाला पाऊण चमचा
  10. हळद पाव चमचा
  11. धणा जीरा पावडर अर्धा चमचा
  12. कांदा लसुण मसाला १ चमचा
  13. मीठ व हळद टाकून वाफवलेली मटकी
  14. कधीपत्ता
  15. जीरं
  16. मीठ
  17. कोथिम्बीर

Instructions

  1. प्रथम कढई मधे २-३ चमचे तेल टाकून त्यात खडा मसाला व बारीक कापलेला कांदा तपकिरी रंग येईपर्यंत परतवुन घ्यावा.
  2. नंतर हयात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून टोमॅटो शिजेपर्यंत परतवुन घ्यावे.
  3. थंड झाल्यावर भाजलेलं खोबरं, लसुण आणि आलं टाकून मिक्सर मधे वाटण करुन घ्यावे.
  4. नंतर कढई मधे अर्धी वाटी तेल टाकून जीरं आणि कधीपत्ता टाकून फोडणी करुन त्यात वाटण टाकून ३-४ मिनिट परतवुन घ्यावे.
  5. नंतर हयात लाल मिर्ची पावडर,धणा जीरा पावडर,काळा/गोडा मसाला,हळद व कांदा लसुण मसाला टाकून तेल सुटेपर्यंत परतवुन घ्यावे.
  6. नंतर हयात आवश्यकतेनुसार पाणी,चवीनुसार मीठ,थोडी साखर व बारीक चिरलेली कोथिम्बीर टाकून रस्सा मध्यम आचेवर उकळू द्यावा.
  7. नंतर हयात वाफवलेली मटकी टाकून ५ मिनिट रस्सा उकळवुन घ्यावा.
  8. Serv करताना बाऊल मधे खाली फरसाण टाकून त्यावरून रस्सा,कांदा व कोथिम्बीर टाकावी.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE