Home / Recipes / Kachya papicha Halava

Photo of Kachya papicha Halava by pranali deshmukh at BetterButter
1090
7
0.0(0)
0

Kachya papicha Halava

Dec-14-2017
pranali deshmukh
35 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Kachya papicha Halava RECIPE

ती खूपच लाजरी बुजरी ....म्हणूनच कि काय ती अशीच पानांच्या मागे लपून बसलेली ......तरीही येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची तिच्यावर नजर जायचीच .....माझं लक्ष होतंच तिच्यावर ..... बस पुरे झालं दुरून दुरून पाहणं ...... आता हिला घरी आणायचंच आणि छान  "हलवा " बनवायचा .....मग काय एकाच क्षणात एकदा लेफ्ट एकदा राईट बघितलं ....ना आव देखा ना ताव .....आणि तोडून किचनमध्ये बसवलं ..... अहो झाड जरी माझ्याच घरचं असलं तरी " कच्ची पपई " तोडायला काळीज वाघाचं लागतं ......कारण सर्वाना माहिती असतं .पपईचा वर्तमान जरी सफेद असला तरी भविष्य मात्र गोड गोड  असतं ..... मग काय बच्चे कंपनीपासून ते मोठे कंपनीपर्यंत सगळे जाताना येताना एक तरी कटाक्ष टाकूनच जातात ... पण सहजासहजी मिळणाऱ्या वस्तूपेक्षा ....काहीतरी थ्रिल करून मिळवलेलं यश  .......जास्तच गोड वाटतं ......एक वेगळाच फील असतो त्यात .....आता हेच   बघा ना ! आपल्याच घरच्या कैऱ्या तोडायच्या असल्या तरी बारीक प्लॅनिंग करावं लागतं ....जसं की भर दुपारची वेळ ......आई झोपलेली .....बाबा ऑफिसला गेलेले ....भांडी घासणारी बाई नुकतीच गेलेली ......नाहीतर आपण कैऱ्या तोडायच्या आणि तिने  ऐनवेळी  तेव्हाच एन्ट्री करायची ....याला दुग्ध लिंबू योग म्हणतात .....हा योगायोग टाळण्यासाठी .....टाइमिंगला खूप महत्व आहे ....भरीत भर ......तिला दिसल्यावर ती पण हिस्सा मागेल ना....तोंड बंद ठेवायला ....  सगळ्याला जवाबदार मेली जालीम  जीभ असते ....ती नको ते प्रयोग करायला लावते ....चिंचेचं झाड दिसलं .,..असं वाटतं त्या दुरून मला बघून  खिदळतात .....चिडवतात .....घे ...घे ...हात नाही ना ...पोहचत ....मनावर दगड ठेवून .....खालचा दगड नकळत उचलल्या जातो आणि थेट शेंड्यावरचा   झुबका माझ्या ओंजळीत येऊन पडतो  ....यात माझी काय चूक आहे हो ?....."जालीम जीभ के लिये "काय काय  कारभार  करणे पडते है .....

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. कच्ची पपई
  2. साखर
  3. फ्रेश क्रीम
  4. वेलची पावडर
  5. ड्रायफ्रूट्स
  6. केशर

Instructions

  1. कच्ची पपई तोडली .
  2. कच्ची पपई ते हलवा
  3. तिची वरची साल हळुवार ....अलगद काढली .
  4. तिला छान किसून घेतली  ......कढईत मोकळ्या हाताने साजूक तूप घातले .
  5. छान पपईचा किस थोडा परतून घेतला .
  6. साखर + फ्रेश क्रीम +केशर +ड्रायफ्रूट्स +वेलची पावडर टाकले .
  7. पपईचा किस आणि हलवा
  8. झाकण ठेवून वाफ काढली .
  9. ..खूप पाणी सुटलेलं होतं म्हणून ....झाकणाशिवाय पाणी आटेपर्यंत शिजवून घेतलं .
  10. झाडापासून ते कढाईपर्यंतचा प्रवास असा झाला .

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE