Home / Recipes / Vhej eggless Andacurry

Photo of Vhej eggless Andacurry by pranali deshmukh at BetterButter
569
6
0.0(0)
0

Vhej eggless Andacurry

Feb-06-2018
pranali deshmukh
20 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Hard
  • Dinner Party
  • Indian
  • Boiling
  • Frying
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. चार बॉईल बटाटे
  2. पनीर 100 gr
  3. खोबरं सुकं 1/2 वाटी किसलेलं
  4. धने 2 tbsp
  5. खसखस 2 tbsp
  6. कांदा 1
  7. अद्रक लसूण पेस्ट
  8. कलमी 1 इंच
  9. तेजपान 1
  10. मिरे 4
  11. दगडफूल 1 tbsp
  12. शहाजिरे 1 tbsp
  13. गोडंबी 2
  14. बडी इलायची 1
  15. लवंग 2
  16. दोन वाळलेल्या लाल मिरच्या
  17. मिरची पावडर 2 चमचे
  18. हळद 1 tbsp
  19. तेल 2 डाव
  20. कस्तुरी मेथी 1 tbsp
  21. कोथिंबीर गार्निशिंगसाठी
  22. तेल तळण्यासाठी

Instructions

  1. बॉईल बटाटे अशाप्रकारे फिलिंग भरण्यासाठी तयार करा .बटाटेबॉईल करताना खूप जास्त शिजायला नको .बॉईल करतांना थोडं मीठ टाका.
  2. खोबरं ,कांदा ,खसखस ,खडा मसाला ,धने पूड भाजून घ्या मिक्सरमधून वाटून घ्या.अद्रक लसूण पेस्ट काढून घ्या.
  3. तेजपान ,कलमी ,मिरे ,शहाजिरे ,गोडंबी,दगडफूल ,लाल वाळलेल्या मिरच्या ,लवंग ,बडी इलायची थोड्या तेलात भाजून वेगळं वाटून घ्या.
  4. पनीर किसून घ्या.
  5. पनीरमध्ये चिमुट्भर हळद मिक्स करा.गॅसवर ठेवून थोडं 2 मिनिट मिक्स करा .
  6. तेल अजिबात ऍड करू नका कोरडेच मंद आचेंवर मिक्स केले कि असं दिसेल.
  7. बटाट्यामध्ये अंड्याच्या पिवळ्या बलकाप्रमाणे हे फिलिंग भरा.भरल्यावर हलक्या हस्तांनी प्रेस करा.
  8. कढईत तेल टाका .गरम तेलात हे बनवलेले अंडे तळून घ्या.विश्वास ठेवा पालटवल्यावरही फिलिंग बाहेर येत नाही.
  9. आता कढईत दोन डाव तेल टाका .मोहरी टाका मोहरी तडतडली कि अद्रक लसूण पेस्ट परतवा नंतर कांदा धने पूड पेस्ट परतवा,आणि शेवटी खसखस खोबरे पेस्ट आणि शेवटी खडा मसाला वाटण घाला छान तेलात भाजा
  10. तेल सुटायला आलं कि तिखट ,हळद , मीठ घाला .दोन वाटी गरम पाणी घाला .भाजीच्या रस्यासाठी गरम पाणी टाकले तर टेस्ट बिघडत नाही.
  11. रस्याला उकळी येऊ द्या .दोन उकळ्या आल्या कि तळलेले अंडे ऍड करा.कसुरी मेथी टाका.
  12. एक उकळी आली कि एगलेस अंडाकरी रेडी . व्हेजमध्ये नोंव्हेजच फिलिंग देणारी .चपाती,भाताबरोबर सर्व्ह करा .
  13. दुसरी पद्धत #### 2 बॉईल बटाटे 50gr..पनीर किसणीने किसून घ्या त्यामध्ये दोन चमचे कॉर्न फ्लोर आणि चिमूटभर मीठ मिक्स करा .
  14. 50gr.पनीर किसून हळद घालून पिवळ्या बलकासारखं तयार करा .
  15. वरील बटाट्याच्या आणि पनीरच्या मिश्रणाला वाटीसारखा आकार द्या .त्यामध्ये पिवळं पनीर गोल छोटा बॉल बनवून भरा .फिलिंग भरल्यावर अंड्यासारखा हातानी आकार द्या .
  16. हा बॉल तेलात तळून घ्या आणि वरीलप्रमाणे रस्सा बनवून उकळत्या रस्स्यात ऍड करा .
  17. मस्त सुरीने अंड मधातून कापून घ्या आणि सर्व करा .कोणी ओळखणाराच नाही .अगदी खरोखरच अंड दिसतं.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE