Home / Recipes / Kelfulanchi bhajj

Photo of Kelfulanchi bhajj by Aarti Nijapkar at BetterButter
893
3
0.0(0)
0

Kelfulanchi bhajj

Feb-09-2018
Aarti Nijapkar
20 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Steaming
  • Sauteeing
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. केळफूल १
  2. काळे वाटाणे १/४ वाटी
  3. पेस्टसाठी साहित्य
  4. कांदा १ लहान
  5. आलं १/२ इंच
  6. लसूण २ ते ३
  7. खोबरं १ मोठा चमचा
  8. कोथिंबीर १ लहान चमचा
  9. जिरे धणे १/२ लहान चमचा
  10. फोडणीसाठी लागणारे साहित्य
  11. तेल १ मोठा चमचा
  12. मोहरी १ लहान चमचा
  13. जिरे १/२ लहान चमचा
  14. हिंग १/४ लहान चमचा
  15. पेस्ट २ मोठे चमचे
  16. हळद १/२ लहान चमचा
  17. लाल तिखट १ मोठा चमचा
  18. काळा मसाला १ मोठा चमचा
  19. गूळ १ लहान चमचा
  20. आमसूल २ ते ३
  21. मीठ चवीपुरते
  22. ओलं खोबरं खवलेला २ मोठे चमचे

Instructions

  1. केळफुलाची कळी
  2. आता प्रथम आपण केळफुलाची भाजी साफ कशी करायची ते पाहूयात
  3. केळफूल सोलून घ्या म्हणजे आमसूली रंगाचे साल काडून आत मध्ये फुलांचा गुच्छ असेल तर तो वेगळे काडून घ्या
  4. अश्या प्रकारे केळफुलाचा दांडा दिसेपर्यंत काडून घ्या
  5. आता काढलेल्या फुलांच्या गुछ्यातला पाकळ्या वेगळ्या करा
  6. आता कळीमध्ये काळा दांडा व पारदर्शक पातळ पापुद्रा काढून टाका
  7. सर्व कळ्या सोलून झाल्या की मिठाच्या पाण्यात भिजत ठेवा २० ते २५ मिनिटे त्यामुळे कळीतला चीक व कडवट पणा निघून जाईल
  8. केळफूल पाण्यातून घट्ट पिळून काढून घ्या
  9. त्याला मध्यम किंवा तुम्हाला हवे तसे चिरून घ्या
  10. भिजवलेले काळे वाटाणे आणि बारीक चिरून घेतलेले कळ्या वेगवेगळ्या कुकरच्या भांड्यात मध्ये घालून शिजवून घ्या २ शिट्या होऊ द्या
  11. आता एक खोलगट भांड घ्या त्यात तेल तापवुन त्यात मोहरी - जिरे - हिंग घालुन परतवा मग तयार पेस्ट घाला व मिश्रण चांगला भाजून घ्या
  12. आता हळद - मीठ - लाल तिखट -काळा मसाला -गूळ - आमसूल घालून मसाला व्यवस्थित एकजीव करून घ्या
  13. काळे वाटाणे आणि केळफूल घाला व मिश्रण एकजीव करून घ्या
  14. काळ्या वाटणेच वाफावलेलं पाणी असेल ते घाला व एक उकळी येऊ द्या. झाल्यावर ताजा खोबरं किस भाजीत घाला व आच बंद करा
  15. गरमागरम केळफुलाची मसाला भाजी चपाती भाकरी किंवा भाता सोबत खा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE