Home / Recipes / Malvani crab masala

Photo of Malvani crab masala by साची सचिन at BetterButter
3555
7
0.0(0)
0

Malvani crab masala

Feb-12-2018
साची सचिन
75 minutes
Prep Time
0 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Malvani crab masala RECIPE

वाटन वापरून केलेली मालवणी पद्धत

Recipe Tags

  • Non-veg
  • Medium
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Main Dish

Ingredients Serving: 6

  1. खेकडे ६
  2. ४-५ चमचे मालवणी मसाला (आवडीनुसार)
  3. १ चमचा गरम मसाला
  4. १ मोठा कांदा बारीक़ चिरलेला
  5. २ चमचे आल लसूण पेस्ट
  6. ५-६ कोकम
  7. चविनुसार मीठ
  8. ६-७ चमचे तेल
  9. वाटण साहित्य:
  10. १ वाटी ओल खोबर
  11. १ वाटी सुख खोबर
  12. ३-४ मोठे कांदे चिरलेले
  13. ४-५ लसूण पाकळ्या
  14. १/२ इंच आल बारीक़ चिरलेल
  15. अर्धी वाटी कोथिंबीर.

Instructions

  1. ओल आणि सुख खोबर एक एक करुन भाजुन घ्यावे. मग कांदा तेलावर चांगला ब्राऊन होई पर्यंत भाजुन घ्यावा.लसुण भाजु नये.मग सर्व वाटनाचे साहित्य एकत्र करुन मिक्सर मधून बारीक़ वाटून घ्यावे.
  2. खेकडे साफ करुन घ्यावे.त्याचे पुढचे 2 डेंगे काढून घ्यावे. मग खेकडयाचे पाय साफ करुन एक बाजूला ठेवावे.मग प्रत्येक खेकडयाला मधून चिरावे किंवा पूर्ण खेकड़ा हवा असल्यास मधून एक चिर द्यावी.मग खेकडे चांगले धुवून घ्यावे.त्याचे पाय सुद्धा चांगले धुवून घ्यावे
  3. मग मिक्सरच्या भांडयात खेकडयाचे पाय घेऊन थोड़े पाणी घालून वाटून घ्यावे. मग एका बारीक़ चाळणीतून वाटलेले पाय गाळून त्याचा स्टॉक काढून एका बाजूला ठेवा.
  4. मग एका खोलगट कढ़इत किंवा पातेलित ४-५ चमचे तेल घ्या.तेल चांगले तापले की त्यात कांदा घालून ब्राउन परतून घ्या.मग त्यात आल लसूण पेस्ट घालून चांगली परता.
  5. गॅस बारीक करुन त्यात मालवणी मसाला हळद घालून १ मिनिट चांगले परता
  6. मग त्यात साफ केलेले खेकडे आणि डेंगे घालून परतून घ्या.(खेकड़ा परतला गेला की लाल होतो)
  7. मग त्यात १ पेला पाणी घाला.नंतर पायाचा काढलेला स्टॉक त्यात घाला.
  8. आता खेकडे बुड़तील एवढं पाणी आणि कोकम घालून एक उकळी आणा.
  9. आता त्यात वाटलेल वाटण ..जेवढ घट्ट ग्रेवी हवी त्या अंदाजाने घाला.(राहिलेल वाटन ग्रेवीच्या भाजी मधे वापरता येईल.)
  10. मग चविनुसार मीठ घालून १५ ते २0 मिनिट मध्यम आचेवार शिजवून घ्या.
  11. मग त्यात गरम मसाला घालुन ५ मिनिटे पुन्हा शिजु दया.
  12. गरम गरम तांदळाच्या भाकरी सोबत सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE