Home / Recipes / Bajari chi khichadi

Photo of Bajari chi khichadi by Ajinkya Shende at BetterButter
2277
9
0.0(0)
0

Bajari chi khichadi

Feb-25-2018
Ajinkya Shende
300 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. दिड वाटी बाजरी(४ तास गरम पाण्यात भीजवलेली)
  2. पाव वाटी जाड तांदूळ
  3. अर्धी वाटी तुरीची डाळ
  4. अर्धी वाटी मुगाची डाळ
  5. तेल १ वाटी
  6. आलं लसुण पेस्ट १ चमचा
  7. जीरं,मोहोरी,हींग,कढीपत्ता
  8. ३ उभे लांब चिरलेले कांदे(भजीसाठी कापतो त्याप्रमाणे)
  9. शेंगदाणे अर्धी वाटी
  10. सुक्या खोबऱ्याचे काप पाव वाटी
  11. १ चमचा लाल मिर्ची पावडर
  12. १ चमचा धणा जीरा पावडर
  13. अर्धा चमचा हळद
  14. दिड ते दोन चमचे काळा किंवा गोडा मसाला
  15. मीठ
  16. कोथिम्बीर

Instructions

  1. प्रथम भीजवलेली बाजरी खलबत्त्यामधे साल निघेपर्यंत व्यवस्थित कुटुन घ्यावी व पंख्याच्या हवेत साधारण अर्धा तास वाळवुन घ्यावी.(तयारी)
  2. नंतर डाळ व तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यावे.
  3. नंतर कूकर मधे १ वाटी तेल टाकून तेल तापल्यावर त्यात हींग,जीरं,मोहोरी,कढीपत्ता,शेंगदाणे, खोबरं व आलं लसुण पेस्ट टाकून थोडं परतवुन घ्यावे.
  4. नंतर त्यात कांदा टाकून कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतवुन घ्यावा.
  5. कांदा परतवुन झाल्यावर त्यात लाल मिर्ची पावडर,धणा जीरा पावडर,हळद व काळा/गोडा मसाला टाकून मसाले सुद्धा थोडे परतवुन घ्यावे फक्त मसाले जळणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
  6. मसाले परतवुन झाल्यावर त्यात बाजरी,तांदूळ व डाळी टाकून २-३ मिनिट परतवुन घ्यावे.
  7. नंतर हयात साधारण ५ ग्लास गरम पाणी टाकून एक उकळी येवु द्यावी.
  8. उकळी आल्यावर चवीनुसार मीठ व बारीक कापलेली कोथिम्बीर टाकून झाकण लावून ७-८ शिटया घ्याव्या.
  9. तयार बाजरीची खिचडी वरून कच्च तेल व लिम्बु टाकून सर्व करावी.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE