Home / Recipes / Baby Shark dry masala

Photo of Baby Shark dry masala by Sujata Loke at BetterButter
980
3
0.0(0)
0

Baby Shark dry masala

Mar-24-2018
Sujata Loke
45 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
8 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Baby Shark dry masala RECIPE

मोरी हा मस्यप्रकार आहे.हा सहसा कोकण ,गोवा, कारवार इथे गरम मसाल्यात मटणा सारखे करतात. खासकरून बाळंतिला देतात .त्यात पातळ ग्रेव्ही किव्हा सुखे करतात.

Recipe Tags

  • Non-veg
  • Hard
  • Dinner Party
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 8

  1. 2 मध्यम साधारण एक फुटाच्या मोऱ्या
  2. 1 वाटी किसलेले सुखे खोबरे
  3. 8 ते 10 लसुण पाकळ्या
  4. दीड इंच आल्याचे तुकडे
  5. 3 मोठे कांदे
  6. 2 टे. स्पून तेल
  7. कोथिंबीर बारीक चिरलेली
  8. 3 टी स्पून मालवणी गरम मसाला
  9. पाव टी .स्पून हळद
  10. मीठ चवीनुसार
  11. 6 ते 7 कोकम

Instructions

  1. मोरी कोळीण कडून सोलून घ्यावी... त्याला जड चामडी असते
  2. मोरीचे मधले हाड काढून बारीक तुकडे करून 6 ते 7 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. कारण मोरीला उग्र वास येतो
  3. एका कढईत 1 मोठा कांदा उभा चिरुन एक टे. स्पून तेलात परतुन घेऊन त्यात लसूण, आले घाला,व्यवस्थित परतल्यावर सुखे खोबरे घालून परतावे. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पाणी न घालता जाडसर वाटुन घेणे
  4. दुसऱ्या कढईत 1 टे. स्पून तेल घालावे..त्यात 2 मोठे कांदे बारीक चिरुन परतुन घ्यावे. त्यात कोकम, मालवणी गरम मसाला, हळद, मोरीचे तुकडे घालून परतावे
  5. 2 ते 3 मिनिटांनी खोबऱ्याचे वाटण, मीठ चवीनुसार, कोथिंबीर घालून 5 मिनिटे शिजू द्यावे.सर्व्ह करताना लिंबू पिळावे.
  6. भाकरी ,चपाती बरोबर खाऊ शकता

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE