Home / Recipes / shimla corn masala

Photo of shimla corn masala by साची सचिन at BetterButter
475
6
0.0(0)
0

shimla corn masala

Apr-11-2018
साची सचिन
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT shimla corn masala RECIPE

ही टेस्टी भाजी आहे.करायला सुद्धा सोपी आहे.चपाती किंवा पराठा सोबत कॉर्नचा क्रंच खुप छान लागतो.

Recipe Tags

  • Veg
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. १ वाटी स्वीट कॉर्न
  2. २ शिमला मिरची
  3. २ कांदे
  4. १ मोठा टोमॅटो
  5. २ हिरवी मिरची
  6. १ चमचा खसखस
  7. १ चमचा आल लसुण पेस्ट
  8. २ चमचे क्रीम
  9. २ चमचे तिखट
  10. १/२ चमचा हळद
  11. १ चमचा गरम मसाला
  12. १ चमचा धना जीरा पाउडर
  13. चविनुसार मिठ
  14. बटर किंवा तेल
  15. फोड़नीसाठी :-
  16. १ तमालपत्र,१ सुखी मिरची,४ लवंग,४ मिरी,२ वेलची

Instructions

  1. कॉर्न हळद आणि चिमुटभर मिठ घालुन ५ मिनिटे उकडवून घ्यावे
  2. एका पॅन मधे १ चमचा खसखस घेऊन भाजुन घ्यावा आणि बाजूला करुन ठेवावा
  3. मग त्याच पॅन मधे १ चमचा तेल घेऊन त्यात हिरवी मिरची घालुन कांदा घालवा आणि गुलाबी रंगावर परतून घ्यावा
  4. मग त्यात टोमॅटो घालून 5 मिनिटे चांगले परतून घ्यावे. मग बाजूला काढून खसखस आणि कांदा टोमॅटो एकत्र मिक्सर मधे बारीक़ करुन घ्यावे.
  5. आता एका दुसऱ्या पॅन मधे १ चमचा बटर घालुन कॉर्न आणि शिमला मिरची घालुन क्रंची होई पर्यंत परतून घ्यावे.आणि बाजूला काढून घ्यावे.
  6. मग परत पॅन मधे १ चमचा बटर घालुन त्यात फोड़नीचे मसाले घालावे.मग त्यात १ चमचा आल लसुण पेस्ट घेऊन चांगले परतावे.
  7. मग त्यात वाटलेला मसाला घालुन परतावे
  8. मग त्यात तिखट,हळद,गरम मसाला,धना जीरा पाउडर घालुन चांगले तेल सुटे पर्यंत परतावे
  9. मग त्यात अर्धी वाटी पाणी घालावे आणि त्यात परतलेले कॉर्न आणि शिमला मिरची घालुन चांगले मिक्स करावे
  10. मग त्यात २ चमचे क्रीम घालुन चांगले मिक्स करुन ५ मिनिटे मध्यम गॅसवर शिजवावे.
  11. शिमला कॉर्न मसाला तयार आहे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE