नारळाच्या दुधातील संत्र्याचा शिरा | Orange Semolina halwa in Coconut Milk Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Orange Semolina halwa in Coconut Milk recipe in Marathi,नारळाच्या दुधातील संत्र्याचा शिरा, Sujata Hande-Parab
नारळाच्या दुधातील संत्र्याचा शिराby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

नारळाच्या दुधातील संत्र्याचा शिरा recipe

नारळाच्या दुधातील संत्र्याचा शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Orange Semolina halwa in Coconut Milk Recipe in Marathi )

 • बारीक रवा - 3-4 टेबलस्पून
 • तूप - 2 टेबलस्पून
 • साखर -2-3 टेबलस्पून
 • कोमट नारळ दूध - 1 कप शिरा साठी + १/४ कप केशर मिश्रण तयार करण्यासाठी 
 • वेलची पूड - 1/2 टिस्पून
 • लहान मनुका - 5-6 अंदाजे चिरून
 • ऑरेंज झीस्ट किंवा बाहेरील आवरण किसून - १ १/२ टिस्पून
 • केसर स्ट्रेंड्स - 8- 9

नारळाच्या दुधातील संत्र्याचा शिरा | How to make Orange Semolina halwa in Coconut Milk Recipe in Marathi

 1. केसर दुधाचे मिश्रण - एका लहान वाडग्यात ¼ कप कोमट नारळाचे दूध घ्या. त्यात केसर टाकून चांगले मिक्स करावे
 2. शिरा - रवा मंद आचेवर लाल रंगावर भाजून घ्यावा. त्याला 8-10 मिनिटे लागतील.
 3. तूप घाला. चांगले एकत्र करून घ्या.
 4. वेलची, जायफळ पावडर, साखर, टाकून घ्या. नीट ढवळून घ्यावे
 5. १ कप कोमट नारळ दूध आणि केसर दुधाचे मिश्रण घाला. आणि १-२ मिनिट चांगले मिक्स करावे. ज्योत बंद करा
 6. बारीक चिरलेल्या मनुका आणि संत्र्याचा झेस्ट किंवा किसलेले बाहेरील आवरण टाका. चांगले मिक्स करावे शिरा तयार आहे.
 7. केसर ने सजवून आणि गरम सर्व्ह करावे.

My Tip:

रवा 8 ते 10 मिनीटे मंद आचेवर कोरडा भाजून घ्यावा.

Reviews for Orange Semolina halwa in Coconut Milk Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo