व्हेजी स्टफ कटलेट्स विथ स्प्राउट्स कव्हर | veggie stuffed cutlets with sprouts cover Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  27th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • veggie stuffed cutlets with sprouts cover recipe in Marathi,व्हेजी स्टफ कटलेट्स विथ स्प्राउट्स कव्हर, deepali oak
व्हेजी स्टफ कटलेट्स विथ स्प्राउट्स कव्हरby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

1

व्हेजी स्टफ कटलेट्स विथ स्प्राउट्स कव्हर recipe

व्हेजी स्टफ कटलेट्स विथ स्प्राउट्स कव्हर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make veggie stuffed cutlets with sprouts cover Recipe in Marathi )

 • भिजवलेले कडधान्य सगळे मिक्स पावकिलो.
 • ८ मीरच्या
 • ८/१० लसूण पाकळी
 • १ ईंच आले
 • जीरे १ चमचा
 • कांदे २ बारिक चीरून
 • कोथिंबीर १वाटी
 • कोबी १ लहान वाटी किसुन
 • गाजर १ लहानवाटी किसुन
 • शिमला मिरची १ चीरून
 • बटाटा १ किसुन
 • टोमॅटो १ चीरून
 • बीट १ लहान किसुन
 • तांदुळाचे पीठ १ वाटी
 • ब्रेड चा चुरा किंवा रवा अर्धी वाटी
 • तेल तळणीसाठी
 • मोहरी पाव चमचा
 • मीठ चवीनुसार

व्हेजी स्टफ कटलेट्स विथ स्प्राउट्स कव्हर | How to make veggie stuffed cutlets with sprouts cover Recipe in Marathi

 1. कढईत एक चमचा तेल घाला.
 2. त्यात अर्धा चमचा जीरे व मोहरी घाला
 3. आता त्यात ४ मिरच्या अर्धा इंच आले व लसूण पाकळी ४/५ चांगले ठेचून घाला.
 4. आता कांदा व टोमॅटो परतून किसलेल्या भाज्या घाला
 5. छान परतून मीठ व कोथिंबीर घाला
 6. हे मिश्रण गार होऊ दया.
 7. आता मिक्स कडधान्य धुवून पाणी काढून घ्या
 8. त्यात ऊरलेले आले मिरची लसूण व जीरे,१कांदा आणि कोथिंबीर घालून कोरडे वाटा
 9. तांदुळाचे पीठ वमीठ घालून मिक्स करा
 10. आता हाताला जरा पाणी लावून कडधान्यांचा वाटलेल्या गोळ्यातील एक लहान गोळा हातावर थापा
 11. त्यात भाजीचे सारण भरून गोल करा
 12. आता हे कटलेट ब्रेड क्रम्ब्स मध्ये घोळवा
 13. तेलात अलगद सोडुन तळून घ्या.

My Tip:

कडधान्य वाटताना पाणी फार घालू नये.सारणासाठी तुम्ही कोणत्याही भाज्या वापरू शकता.

Reviews for veggie stuffed cutlets with sprouts cover Recipe in Marathi (1)

Nayana Palav4 months ago

Wow
Reply

Cooked it ? Share your Photo