मोदकाची आमटी | MODAKACHI aamti Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  30th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • MODAKACHI aamti recipe in Marathi,मोदकाची आमटी, Chayya Bari
मोदकाची आमटीby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

4

0

मोदकाची आमटी recipe

मोदकाची आमटी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make MODAKACHI aamti Recipe in Marathi )

 • STuffing साठी
 • खोबरे किस 1 वाटी
 • कोथिंबीर बारीक चिरलेली १वाटी
 • खसखस २चमचे
 • तीळ १चमचा
 • बेसन २चमचे
 • तिखट १चमचा
 • गरम मसाला १/२चमचा
 • मीठ चवीला
 • हळद १/२चमचा
 • पारी
 • बेसन २वाट्या
 • हळद ,तिखट प्रत्येकी १/२चमचा
 • मीठ चवीला
 • धने,जिरे पावडर १/२चमचा
 • तेल २चमचे
 • रस्सा
 • कांदा १
 • खोबरे किस ४चमचे
 • आले लसूण पेस्ट १चमचा
 • कोथिंबीर 3 चमचे
 • तिखट १चमचा
 • काळा मसाला १चमचा
 • हळद १चमचा
 • मीठ चवीला
 • जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
 • धने १चमचा
 • तेल ४चमचे
 • मोदक तळण्यासाठी तेल २००ग्राम

मोदकाची आमटी | How to make MODAKACHI aamti Recipe in Marathi

 1. प्रथम stuffing चा खोबरे किस,बेसन ,खसखस,तीळ भाजून घेतले
 2. व सर्व मिक्स करून सारण बनविले
 3. मग बेसन तिखट मीठ हळद तेल घालून घट्ट भिजवले
 4. मग रश्श्याचा कांदा,खोबरे किस ,धने भाजून यात कोथिंबीर घेऊन मिक्सरवर वाटण केले
 5. तेल तापवून जिरे मोहरी हिंगाची फोडणी केली त्यात तिखट,हळद,मीठ,काळा मसाला घालून परतले आले लसूण पेस्ट परतलीे मग वाटणं घालून तेल सुटेस्तोवर परतले गरजेप्रमाणे पाणी टाकून रस्सा केला गरम मसाला व मीठ घातले उकळल्यावर खाली उतरवला
 6. मग पुरीएव्हडा गोळा घेऊन पिठाची पुरी लाटून सारण भरून मोदक बनविले व तेल तापवून त्यात खरपूस तळून घेतले
 7. वाढतेवेळी रस्सा गरम करून त्यात मोदक सोडून एक उकळी घ्यावी व कोथिंबीर घालून लगेच सर्व्ह करावे
 8. पोळी भाताबरोबर छान लागते

My Tip:

मोदक वाढण्यापूर्वीच रश्श्यात घालावे फार आधी घालू नये

Reviews for MODAKACHI aamti Recipe in Marathi (0)