राजस्थानी खुबा रोटी | Rajasthani Khooba Roti Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  4th Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Rajasthani Khooba Roti recipe in Marathi,राजस्थानी खुबा रोटी, Deepa Gad
राजस्थानी खुबा रोटीby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

5

1

राजस्थानी खुबा रोटी recipe

राजस्थानी खुबा रोटी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rajasthani Khooba Roti Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ १ कप
 • ४-५ च तूप
 • मीठ चवीनुसार
 • कसुरी मेथी १ च
 • रेड चिल्ली फ्लेक्स १ च
 • पाणी आवश्यकतेनुसार

राजस्थानी खुबा रोटी | How to make Rajasthani Khooba Roti Recipe in Marathi

 1. गव्हाच्या पिठात मीठ, चिल्ली फ्लेक्स, कसुरी मेथी, २ च तूप घालून हाताने व्यवस्थित एकजीव करा
 2. आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट मळा व वरून गोळ्याला तूप लावून १० मिनिटे झाकून ठेवा
 3. मोठा गोळा म्हणजे २ चपात्या होतील एवढा गोळा घेऊन जाडसर २ इंचाची पोळी लाटा
 4. उलटी करून सुरीने त्याला अलगद टोचा मारा व कडेनेही गोलाकार टोचा मारा
 5. आता पोळी परत पलटी करून घ्या
 6. चिमट्याने त्याला दाबून चिमटा काढल्यासारखे वरचेवर करून डिझाईन बनवा, चिमटा नसेल तर हाताने चिमटा काढतो तसं गोलाकार करून घेणे
 7. नंतर गोलाकार कडा ही चिमट्याने दाबून घ्या व मध्यम गॅसवर तवा तापवून त्यावर अलगद टाका चिमट्याची डिझाईन वर येईल
 8. हाताने मध्ये मध्ये गोल फिरवत रहा चांगलीे भाजू द्या
 9. नंतरच पोळी उलटी करून भाजा अलगद फिरवत रहा, डिझाईन मोडणार नाही याची काळजी घ्या
 10. दुसरी बाजू भाजली की परत पलटी मारून डिझाईन असलेल्या बाजूवर तूप वरून सोडा आणि भाजा
 11. मस्त खुसखुशीत अशी ही खुबा रोटी कोणत्याही ग्रेव्ही असलेल्या भाजीबरोबर किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करा

My Tip:

ही खुबा रोटी जाडसरच बनवा तरच ती खुसखुशीत होईल

Reviews for Rajasthani Khooba Roti Recipe in Marathi (1)

deepali oak4 months ago

Mastach
Reply