Home / Recipes / Roti Pe Boti

Photo of Roti Pe Boti by Aarti Nijapkar at BetterButter
1586
5
0.0(0)
0

Roti Pe Boti

Mar-13-2018
Aarti Nijapkar
10 minutes
Prep Time
40 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Dinner Party
  • Indian
  • Steaming
  • Frying
  • Sauteeing
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. रोटी साठी साहित्य
  2. मैदा १ कप
  3. मीठ १ लहान चमचा
  4. तेल १/२ चमचा
  5. पाणी पीठ मळण्यासाठी
  6. बोटी साठी साहित्य
  7. बोनलेस चिकन २५० ग्रॅम
  8. दही १ मोठा चमचा
  9. कांदा चिरलेला १ मोठा
  10. टोमॅटो चिरलेला १ मध्यम
  11. कोथिंबीर चिरलेली १ मोठा चमचा
  12. आलं लसूण पेस्ट १ मोठा चमचा
  13. हळद १/४ लहान चमचा
  14. धने पावडर १ लहान चमचा
  15. जिरे पावडर १ लहान चमचा
  16. मीठ चवीनुसार
  17. तेल २ मोठे चमचे

Instructions

  1. रोटी ची कृती
  2. एका परातीत किंवा भांड्यात मैदा , मीठ , तेल आणि पाणी गरजेनुसार पाणी घालून कणिक व्यवस्थित मळून घ्या, कणिक जास्त नरम करू नये घट्ट असावे १० मिनिटे झाकून ठेवा
  3. आता तयार कणकेचा गोळा लाटून लहान गोलाकार कट करून घ्या लहान आकाराचे गोलाकार कटर घ्यावे
  4. कढईत तेल घालून चांगल तापवून घ्या तयार लहान रोटी तेलात मध्यम आचेवर दोन्ही बाजूस सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावे ह्या रोटी कुशकुशीत झाल्या पाहिजे
  5. बोटी ची कृती
  6. चिकन चे लहान तुकडे करून पाण्यात धावून घ्या
  7. आता एका पॅन मध्ये किंवा कढईत तेल घालून तापवा त्यात चिरलेला कांदा , टोमॅटो , आलं लसूण पेस्ट घालून चांगलं परतवून घ्या तेल सुटू द्या
  8. मग लाल तिखट ,धने , जिरे पावडर , हळद , गरम मसाला व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या व परतवून घ्या
  9. आता मसाल्यात दही व चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकजीव करून घ्या
  10. आता बारीक केलेले चिकन चे तुकडे घालून मसाल्यात एकत्र करून घ्या व झाकण ठेवून शिजवून घ्या
  11. मसाल्यात पाणी राहू देऊ नये चिकन मसालेदार पण सुखे बनवायचं आहे
  12. तयार चिकन वर चिरलेली कोथिंबीर घालीन आच बंद करा
  13. आता तयार झालेल्या रोटी घ्या त्यावर चिकन तुकडे म्हणजेच बोटी ठेवा व ओली लाल मिरची व कोथिंबीर ने सजावट करा
  14. तयार रोटी पे बोटी चा आनंद घ्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE