गव्हाच्या पीठाचे बिस्कीट | Wheat Flour Biscuit with Cashew nuts Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  8th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Wheat Flour Biscuit with Cashew nuts recipe in Marathi,गव्हाच्या पीठाचे बिस्कीट, Bharti Kharote
गव्हाच्या पीठाचे बिस्कीटby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  75

  मि.
 • किती जणांसाठी

  7

  माणसांसाठी

19

0

गव्हाच्या पीठाचे बिस्कीट recipe

गव्हाच्या पीठाचे बिस्कीट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Wheat Flour Biscuit with Cashew nuts Recipe in Marathi )

 • एक कप गव्हाचे पीठ
 • 1/2 कप पीठी साखर
 • 1/3 कप साजूक तूप
 • 1/4 कप काजुचे तुकडे
 • 1/2 कप दूध
 • 1 टीस्पून मीठ
 • 1/2 टीस्पून बेकिंग पावडर

गव्हाच्या पीठाचे बिस्कीट | How to make Wheat Flour Biscuit with Cashew nuts Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात हे सर्व जिन्नस एकञ करून घ्या. .
 2. थोडे थोडे दूध घालून पीठ चांगल मळून घ्याव. .
 3. गॅस वर एक कढई ठेवा त्यात वाटी भर मीठ घालून त्या वर जाळी ठेवा. .झाकण ठेवून 15 मी.गरम होऊ दया. .
 4. तोपर्यंत छोटे छोटे गोळे बनवा आणि हातावर गोळा घेऊन घरातील साहित्यांचया साह्याने डिझाईन पाडून बिस्कीट बनवून घ्या. .
 5. मी हे साहित्य वापरले. .
 6. सर्व बिस्कीट बनवून घ्या. .
 7. आता एका ताटात बिस्कीट ठेवून ते बेक होण्या साठी कढई मध्ये ठेवा. .
 8. त्या वर झाकण ठेवून 20 मी..ठेवा. .
 9. आता झाकण ऊघडून बघा..
 10. छान तपकिरी कलर चे खुशखुशीत बिस्कीट तयार. .

My Tip:

कढई च्या ऐवजी तुम्ही कूकर मध्ये बेक करू शकता. ...

Reviews for Wheat Flour Biscuit with Cashew nuts Recipe in Marathi (0)