BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / वांगी भरीत वडे

Photo of VANGI bharit vade by Chayya Bari at BetterButter
0
7
0(0)
0

वांगी भरीत वडे

Jul-15-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वांगी भरीत वडे कृती बद्दल

वांगी भरीत व बाजरीची भाकरी सर्वांनाचं आवडते तेच कॉम्बिनेशन वापरून केलेली ही इनोव्हेटिव्ह पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भाजलेले भरताचं मोठं वांगं 1
  2. कांदा पात किंवा कांदा कापून 1 वाटी
  3. हिरवी मिरची पेस्ट 1 ते 1.5 चमचा
  4. आले लसूण पेस्ट 1 चमचा
  5. जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  6. कोथिंबीर बारीक कापून 1 वाटी
  7. हळद 1 चमचा
  8. शेंगदाणे 1 चमचा
  9. शेंगदाणे कूट जाडसर 2 चमचे
  10. मीठ चवीनुसार
  11. बाजरी पीठ 2 वाट्या
  12. तेल तळण्यासाठी व भरीत साठी

सूचना

  1. प्रथम भरीतची तयारी करावी व बाजरीच्या पिठात चवीला मीठ व 1 चमचा गरम तेल घालून कोमट पाण्याने भजी च्या पिठासारखे भिजवावे
  2. मग तेल तापवून जिरे,मोहरी,हिंग फोडणी करावी त्यात शेंगदाणे परतावे
  3. मग आले लसूण पेस्ट,हिरवी मिरची पेस्ट,कांदा किंवा कांदा पात परतून हळद मीठ दाण्याचा कूट घालून परतावे
  4. मग भाजलेले वांगे घालून परतून वाफ घ्यावी कोथिंबीर घालून हलवून उतरून भरीत गार करावे
  5. आता भरीतचे गोल गोळे करून भिजवलेल्या बाजरीच्या पिठात घोळावे
  6. तेल तापवून त्यात वडे सोडून तळावे
  7. दोन्ही बाजूने छान तळून घ्यावे व चटणी बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर