कुळीथ व ज्वारीच्या पिठाची शेंगोळे | Shengole Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shengole recipe in Marathi,कुळीथ व ज्वारीच्या पिठाची शेंगोळे, Aarya Paradkar
कुळीथ व ज्वारीच्या पिठाची शेंगोळेby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

0

कुळीथ व ज्वारीच्या पिठाची शेंगोळे recipe

कुळीथ व ज्वारीच्या पिठाची शेंगोळे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shengole Recipe in Marathi )

 • 1 वाटी ज्वारीचे पीठ
 • 1/2 वाटी कुळीथ पीठ
 • 4 चमचे तिळ
 • 2 चमचे तिखट
 • 1 चमचा धणे जिरे पावडर
 • 1 बारीक चिरलेला कांदा
 • 1 चमचा आलं लसुण पेस्ट
 • 1 चमचा हळद
 • पाव चमचा हिंग
 • 1/2 चमचा साखर
 • कोथिंबीर
 • चवीनुसार मीठ
 • तेल
 • मोहरी

कुळीथ व ज्वारीच्या पिठाची शेंगोळे | How to make Shengole Recipe in Marathi

 1. प्रथम परातीत दोन्ही पीठे एकत्रित करणे
 2. त्यात बारीक चिरलेला कांदा, आले लसूण पेस्ट घालणे
 3. नंतर तिखट, मीठ, धणे जिरे पावडर 1 चमचा तिळ, 1/2 चमचा हळद चिमूटभर हिंग घालून पिठ भिजवून घेणे
 4. नंतर हातावर शेंगोळे करुन तव्यावर सॅलो फ्राय /वाफवून घ्यावी
 5. नंतर त्याचे काप करावे
 6. एका भांड्यात थोडे जास्त तेल गरम करुन त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करावी लगेच तीळ टाकावे ते तडतडल्यावर त्यात 1 चमचा तिखट चवीपुरते मीठ व साखर घालून वाफवलेले शेंगोळे चे काप घालून परतणे
 7. सॉस बरोबर सर्व्ह करणे

Reviews for Shengole Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo