शेजवान फ्राईड राईस | Shezwan Fried Rice Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  18th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shezwan Fried Rice recipe in Marathi,शेजवान फ्राईड राईस, Deepa Gad
शेजवान फ्राईड राईसby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

शेजवान फ्राईड राईस recipe

शेजवान फ्राईड राईस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shezwan Fried Rice Recipe in Marathi )

 • २ वाट्या बासमती तांदूळ
 • कोबी पाव किलो
 • गाजर २
 • सिमला मिरची २
 • कांदा १
 • लसूण पाकळ्या ५-६
 • शेजवान सॉस ४ च
 • सोया सॉस ३ च
 • फ्राईड राईस मसाला २ च
 • तेल
 • मीठ

शेजवान फ्राईड राईस | How to make Shezwan Fried Rice Recipe in Marathi

 1. बासमती तांदूळ धुवून १५ मिनिटे ठेवा
 2. कढईत ५ वाट्या पाणी गरम करायला ठेवा व त्यात २ च तेल, मीठ १/२ च घाला
 3. नंतर भिजवलेला तांदूळ घाला
 4. थोडा अर्धवट शिजवा नंतर गाळणीत ओता म्हणजे मोकळा होईल
 5. कढईत तेल घालून चिरलेला लसूण , कांदा उभा चिरलेला, कोबी, गाजर, सिमला मिरची चिरून घालावं शिजेपर्यंत परता
 6. सोया सॉस, शेजवान सॉस, शेजवान फ्राईड मसाला घाला मीठ बेताचच घाला कारण सॉस मध्ये मीठ असतं
 7. शिजवलेला भात घालून अलगद एकजीव करा झाकण ठेवून एक वाफ काढा
 8. तयार आहे शेजवान फ्राईड राईस आणि पापड

My Tip:

मीठ थोडंच घाला कारण दोन्ही सॉसमध्ये मीठ असतं तसेच भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घाला (मटार, ब्रोकोली, कांद्याची पात)

Reviews for Shezwan Fried Rice Recipe in Marathi (0)