फ्लॉवर बटाटा मसाला | Flower batata masala Recipe in Marathi

प्रेषक दिपाली सावंत  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Flower batata masala recipe in Marathi,फ्लॉवर बटाटा मसाला, दिपाली सावंत
फ्लॉवर बटाटा मसालाby दिपाली सावंत
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

About Flower batata masala Recipe in Marathi

फ्लॉवर बटाटा मसाला recipe

फ्लॉवर बटाटा मसाला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Flower batata masala Recipe in Marathi )

 • पाव किलो फ्लॉवर तुकडे (स्वच्छ धुवून तुकडे करून)
 • 1 बटाटा साल काढून चिरलेला
 • 1 कांदा बारीक चिरलेला
 • 1 टोमॅटो बारीक चिरलेला
 • राई, जिर, हिंग हळद
 • लाल तिखट, पाव-भाजी मसाला 1 चमचा
 • कडीपत्ता आलं-लसुण क्रश
 • तेल
 • मिठ
 • ओल खोबर , कोथिंबीर

फ्लॉवर बटाटा मसाला | How to make Flower batata masala Recipe in Marathi

 1. एका कढईत तेल गरम करून त्यात राई जीर हिंग कडीपत्ता हळद आलं-लसूण क्रश घाला
 2. चिरलेला कांदा घालून चांगले परतून घ्या, त्यात फ्लॉवर चे तुकडे , बटाटा व मिठ घालून तेलात 2 मिनिटे चांगले परतून घ्या
 3. लाल तिखट, पाव-भाजी मसाला , बारीक चिरलेला टोमॅटो व थोडेसे पाणी घालून झाकण लावून वाफेवर शिजु द्या
 4. 5 मिनिटांनी फ्लॉवर बटाटा शिजल्यावर ओलं खोबरं व कोथिंबीर घालून 2 मिनिटे वाफवा.
 5. फ्लॉवर बटाटा मसाला भाजी तयार

My Tip:

मसाले घालण्याआधी फ्लॉवर तेलात परतल्यामुळे चव छान लागते

Reviews for Flower batata masala Recipe in Marathi (0)