मसालेभात | Masalebhaat Recipe in Marathi

प्रेषक Sanika SN  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Masalebhaat recipe in Marathi,मसालेभात, Sanika SN
मसालेभातby Sanika SN
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  59

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

मसालेभात recipe

मसालेभात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Masalebhaat Recipe in Marathi )

 • दीड वाट्या बासमती तांदूळ धुवून, १५-२० मिनिटे निथळत ठेवावे
 • १ वाटी उभी चिरलेली तोंडली
 • १/२ वाटी मटारचे दाणे
 • १/२ वाटी खवलेले ओले खोबरे
 • १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
 • २ टेस्पून आले+लसूणची भरडसर पेस्ट
 • १/४ वाटी काजू पाकळ्या
 • १ टीस्पून मोहरी
 • ५-६ कढीपत्ता
 • १/२ टीस्पून साखर
 • १/४ टीस्पून हींग
 • मीठ चवीनुसार
 • मसाला साहित्य:
 • ३ लाल सुक्या मिरच्या
 • दालचिनीची काडी तोडून
 • १ मसाला वेलची
 • २-३ लवंगा
 • १ टेस्पून पांढरे तीळ
 • १ टेस्पून सुके खोबरे
 • १ टीस्पून जीरे

मसालेभात | How to make Masalebhaat Recipe in Marathi

 1. एका पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करून त्यात मसालेभातासाठी लागणार्‍या मसाल्याचे साहित्य घालून मंद आचेवर ३-४ मिनिटे परतावे.
 2. खमंग भाजावे पण करपवू नये.
 3. थंड झाले की मिक्सरमधून बारीक पूड वाटून घ्यावी.
 4. जाड बुडाच्या पातेल्यात २ टेस्पून तेल गरम करुन मोहरी, हिंग व कढिपत्त्याची फोडणी करावी.
 5. त्यात आले+लसूण पेस्ट घालून चांगली परतावी.
 6. आता त्यात काजू पाकळी घालून हलक्या सोनेरी रंगावर परतणे.
 7. त्यात मटार, तोंडली व निथळत ठेवलेला तांदूळ घालून एकत्र करावे.
 8. चवीनुसार मीठ, वाटलेला मसाला घालून एकत्र करावे.
 9. त्यात ३ वाट्या उकळते पाणी घालावे व उकळी आणावी.
 10. उकळी आली की त्यात साखर घालून, गॅस मंद करुन , झाकून ८-१० मिनिटे शिजवावे
 11. मसालेभातावर ओले खोबरे व कोथींबीर घालून सजावट करावी.
 12. साजूक तूप घालून मसालेभात गरम सर्व्ह करावा.

My Tip:

वरील मसाल्याऐवजी गोडा मसाल्याचाही वापर करु शकता.

Reviews for Masalebhaat Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo