रताळ्याची बर्फी | Sweet Potato Barfi Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  19th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sweet Potato Barfi recipe in Marathi,रताळ्याची बर्फी, Aarti Nijapkar
रताळ्याची बर्फीby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

रताळ्याची बर्फी recipe

रताळ्याची बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet Potato Barfi Recipe in Marathi )

 • वाफवलेले रताळे ४ ते ५
 • ओले खोबरे किसलेले १/३ वाटी
 • तूप १ मोठा चमचा
 • दुधाची पावडर २ मोठे चमचे
 • गूळ १/४ वाटी किंवा गोडीनुसार
 • वेलची पूड १/२ लहान चमचा
 • बदाम पिस्ता केसर सजावटीसाठी

रताळ्याची बर्फी | How to make Sweet Potato Barfi Recipe in Marathi

 1. प्रथम वाफवलेले रताळे सोला व किसून घ्या ओले खोबरं किसून घ्या
 2. गॅस वर पॅन किंवा कढई गरम करा त्यात तूप घाला किसलेले रताळे व खोबरे एकत्र करून मंद आचेवर परतवून घ्या
 3. खरपूस भाजले की त्यात दुधाची पावडर घाला व एकत्र करून घ्या
 4. आता गूळ घालून मिश्रण एकजीव करून घ्या गूळ वितळले की आच मंद करा व सतत परतत रहा जेणेकरून गूळ जळणार नाही
 5. मिश्रण छानसं एकजीव झाले की त्यात वेलची पूड घाला व एकत्र करून गॅस बंद करा
 6. आता एका ताटाला तूप लावून घ्या व मिश्रण ताटात घालून पसरवून घ्या त्यावर बदाम पिस्त्याचे काप घालून घ्या व मिश्रण थंड होऊ द्या
 7. थंड झाल्यावर बर्फीच्या आकारात सुरीने कापून घ्या
 8. बदाम पिस्ता केसर ने सजावट करा
 9. आणि मस्त रताळ्याच्या बर्फीचा आस्वाद घ्या
 10. रताळ्याची वडी/ बर्फी तयार आहे

My Tip:

दूध पावडर ऐवजी मावा घालू शकता,शक्यतो काळ्या गुळाचा वापर करावा,दूध घालू नये कारण रताळे हे मऊ असल्यामुळे बर्फी फार नरम होइ

Reviews for Sweet Potato Barfi Recipe in Marathi (0)