मुख्यपृष्ठ / पाककृती / गवारीची आमटी ( बिना कांदा लसूण )

Photo of Gawarichi Aamti by Vaishali Joshi at BetterButter
907
0
0.0(0)
0

गवारीची आमटी ( बिना कांदा लसूण )

Sep-19-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गवारीची आमटी ( बिना कांदा लसूण ) कृती बद्दल

कांदा लसूण नैवेद्या च्या पानात चालत नाही म्हणून काय झाले ? त्या शिवाय पण इतकी चवीष्ट रस्सा भाजी होऊ शकते की .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गवार शेंगा २५० ग्राम तोडून किंवा कापून
  2. टोमेटो १
  3. कोथिंबीर
  4. लाल मिरच्या २
  5. खोब्रा किस २ चमचे
  6. खसखस १ चमचा
  7. जीर १ छोटा चमचा
  8. धणे पावडर १ चमचा
  9. गोडामसाला १ छोटा चमचा
  10. हिंग
  11. तेल
  12. तिखट
  13. हळद
  14. मीठ

सूचना

  1. तोडलेल्या गवार शेंगा धुवून घ्या आणि त्याला थोड मीठ , हळद , हिंग आणि १ चमचा तेल चोळून वरणभाताचा कुकर लावताना वरती प्लेट मधे ठेवा आणि उकडून घ्या
  2. टोमेटो , लाल मिरच्या , खोबर , खसखस मिक्सर मधून बारीक़ मसाला वाटुन घ्या
  3. गैस वर कढईत तेल टाका तापल्यावर मोहोरी टाका आणि वाटलेला मसाला टाकुन तेल सुटे पर्यंत परता
  4. तिखट, हळद ,धणे पावडर, गोडा मसाला घालून परता थोड पाणी घालून मसाला हलका होउ द्यावा उकडून घेतलेल्या गवार शेंगा टाकुन परतून घ्या नंतर जेवढा पातळ रस्सा हवा तेवढे पाणी घालून मीठ टाकुन झाकण ठेवा अन वाफ येऊ द्या ५ मिनिटाने गैस बंद करा आणि वरून कोथिंबीर भुरभुरवा
  5. नैवेद्याच्या पानात वाढायला गवारिची आमटी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर