मुख्यपृष्ठ / पाककृती / प्रसादाचा गोड शिरा

Photo of Sweet Sheera by Suchita Wadekar at BetterButter
266
0
0(0)
0

प्रसादाचा गोड शिरा

Sep-24-2018
Suchita Wadekar
5 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

प्रसादाचा गोड शिरा कृती बद्दल

आमच्याकडे गणपती मध्ये सत्यनारायण पूजा केली जाते त्यावेळी प्रसादासाठी नैवैद्य म्हणून हा शिरा केला जातो. तसेच एरव्ही ही आम्ही असाच शिरा बनवतो. हा शिरा अतिशय सुंदर लागतो आणि सत्यनारायण पूजेदिवशी तर हा खूपच भारी होतो.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

 1. बारीक रवा अर्धा किलो
 2. साखर अर्धा किलो
 3. तूप अर्धा किलो
 4. दूध दीड ली.
 5. काजू, बदाम बारीक चिरून 1 वाटी
 6. वेलची पावडर 2 चमचे

सूचना

 1. प्रथम बारीक रवा चाळणीने चाळून कढईत कोरडाच भाजून घ्यावा.
 2. रवा भाजत आल्यानंतर त्यात तूप घालावे.
 3. थोडे भाजून घेऊन मग यात दूध घालून झाकण ठेवावे.
 4. दोन मिनिटांनी झाकण काढून व्यवस्थित हलवून घ्यावे.
 5. यानंतर यात साखर घालावी व पुन्हा एकसारखे हलवून झाकण ठेवावे.
 6. दोन मिनिटांनी झाकण उघडून त्यामध्ये वेलची पावडर आणि काजू बदामाचे केलेले काप घालावेत आणि व्यवस्थित हलवून घ्यावे.
 7. असेल तर केशर घालावे आणि सर्व्ह करावा प्रसादाचा शिरा.
 8. बाप्पाचा नैवेद्य ...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर