मुख्यपृष्ठ / पाककृती / पिंडी छोले

Photo of Pindi Chole by Manisha Lande at BetterButter
1221
2
0.0(0)
0

पिंडी छोले

Oct-05-2018
Manisha Lande
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिंडी छोले कृती बद्दल

पिंडी छोले खुप चविष्ट आणि चमचमीत डिश आहे. पण त्याचबरोबर पौष्टिक देखील आहे कारण त्यात छोले म्हणजेच काबुली चणे आहेत आणि त्यात मुबलक प्रमाणात प्रोटीन्स व कॅल्शियम असतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. १ वाटी छोले/ काबुली चणे
  2. २ मोठे कांदे
  3. २ मध्यम आकाराचे टोमॅटो
  4. १/४ वाटी काजू
  5. ३ मोठा चमचे तेल
  6. २ मोठे चमचे छोले मसाला
  7. १ मोठा चमचा लाल तिखट
  8. १ मोठा चमचा हळद
  9. १/४ छोटा चमचा जिरं
  10. १/४ छोटा चमचा हिंग
  11. २ ते ३ लवंगा
  12. २ ते ३ काळी मिरी
  13. १ मोठा तुकडा दालचिनी
  14. १/४ छोटा चमचा चहा पावडर
  15. १/४ छोटा चमचा कसुरी मेथी
  16. चवीनुसार मीठ

सूचना

  1. प्रथम छोले ७ ते ८ तास भिजत ठेवले, नंतर पाण्याने २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घेतले.
  2. मलमलच्या कपड्याचा एक तुकडा घेवुन त्यात लवंगा, दालचिनी, मिरी, जिरं, व चहा पावडर घालून त्याची एक छोटी पोटली बनविली.
  3. प्रेशर कुकरमध्ये १ मोठा पेला पाणी घालुन त्यात भिजवलेले छोले, हळद, हिंग, तयार पोटली घालून झाकण बंद करून गॅसवर ठेवून मोठया आचेवर ७ ते ८ शिट्टया काढून छोले शिजवून घेतले.
  4. कांदा व काजू मिक्सरमध्ये घालून त्यात थोडं पाणी घालुन बारीक पेस्ट करून घेतली.
  5. टोमॅटो मिक्सरमध्ये थोड्या पाण्याबरोबर वाटून पेस्ट करुन घेतली.
  6. कढईत तेल गरम करून त्यात कांदा-काजू ची पेस्ट घालून छान सोनेरी रंगावर खमंग परतून घेतली.
  7. त्या मिश्रणात टोमॅटो पेस्ट घालून तीही तेल सुटेपर्यंत परतली.
  8. नंतर त्यात शिजवलेले छोले, छोले मसाला, लाल तिखट, हळद व थोडं पाणी घालुन सर्व मिश्रण एकजीव करून घेतले.
  9. नंतर त्यात चवीपुरतेच मीठ व कसुरी मेथी घालून सर्व मिश्रण एकजीव करून त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर छोले छान वाफवून घेतले.
  10. "पिंडी छोले" सर्व्हिंग डिशमध्ये काढून त्यावर आल्याचे ज्युलियन्स व कोथिंबिरीचे पान लावून गरमागरम पुरींबरोबर सर्व्ह केले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर