लेमन राईस | Lemon Rice Recipe in Marathi

प्रेषक Sujata Limbu  |  25th Aug 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Lemon Rice by Sujata Limbu at BetterButter
लेमन राईसby Sujata Limbu
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1887

0

लेमन राईस recipe

लेमन राईस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Lemon Rice Recipe in Marathi )

 • 1 वाटी बासमती तांदूळ (ताजे/शिळे)
 • 1 लहान चमचा मोहरी
 • 1 लहान चमचा उडीदडाळ
 • 1 लहान चमचा चणाडाळ
 • 1 मोठा चमचा शेंगदाणे
 • 1/3 लहान चमचा हिंग
 • 1 मोठा चमचा तेल
 • अर्धा लहान चमचा हळद पूड
 • 5 कडीपत्त्याची पाने
 • 1 मोठा चमचा लिंबाचा रस
 • मीठ चवीनुसार

लेमन राईस | How to make Lemon Rice Recipe in Marathi

 1. बासमती तांदूळ धुऊन घ्या आणि प्रेशर कुकरमध्ये शिजवा. तांदूळ अधिक शिजणार नाही याची काळजी घ्या. या मेनुसाठी तुम्ही उरलेला भात सुध्दा वापरू शकतात.
 2. एक पॅन घ्या, त्यात तेल गरम करा. आणि त्यात मोहरी घालून तडतडवा.
 3. नंतर उडीदडाळ, चणाडाळ. हिंग, शेंगदाणे, कडीपत्ता आणि चवीनुसार मीठ घाला. याला नीट मिसळा आणि 2 मिनिटांसाठी शिजवा.
 4. नंतर लिंबाचा रस घाला आणि या मिश्रणाला पुन्हा 1 मिनिट शिजवा.
 5. नंतर त्वरित या मिश्रणाला शिजलेल्या तांदळात घाला आणि सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत मिसळा. आता याला 3-4 मिनिटे शिजवा.
 6. रायता किंवा तुमच्या आवडीच्या चटणीबरोबर गरमगरम वाढा.

Reviews for Lemon Rice Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo