Photo of Bread rol by SUCHITA WADEKAR at BetterButter
713
3
0.0(0)
0

ब्रेड रोल

Oct-24-2018
SUCHITA WADEKAR
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड रोल कृती बद्दल

ब्रेड रोल करायला खूप सोपे आणि चविष्ट लागतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. बऱ्याचदा तेच तेच पदार्थ नाश्त्याला करून कंटाळा येतो, मुलांना काहीतरी वेगळे हवे असते अशावेळी ब्रेड रोल करावेत. साहित्यही खूप कमी लागते, बटाट्याची भाजी केली आणि ब्रेड आणला की लगेच होतात. काहींना हे ब्रेड रोल डीप फ्राय केलेले आवडतात तर काहींना शॅलो फ्राय केलेले आवडतात. हल्लीची पिढी खूप हेल्थ कॉन्शस आहे त्यामुळे तळण्यापेक्षा शॅलो फ्राय केव्हाही चांगले. Try करा ब्रेड रोल. :thumbsup:

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ● ब्रेड 1
  2. ● तेल आवश्यकतेनुसार
  3. ● टोमॅटो सॉस सजावटी साठी
  4. ★ बटाट्याची भाजी साहित्य --
  5. ● बटाटे अर्धा किलो
  6. ● हिंग पाव चमचा
  7. ● हळद अर्धा चमचा
  8. ● आले 1 इंच
  9. ● लसूण 4-5 पाकळ्या
  10. ● हिरवी मिरची 4-5
  11. ● कोथिंबीर
  12. ● मीठ
  13. ● पाणी

सूचना

  1. प्रथम बटाटे उकडून घ्या.
  2. उकडलेल्या बटाट्याची साले काढून हाताने कुस्करून (स्मॅश) करून घ्या.
  3. हिरवी मिरची, लसूण, आले, कोथिंबीर मीठ घालून हिरवे वाटण करून घ्या.
  4. गॅसवर एका कढईत 3-4 चमचे तेल घालून हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करा, यात मिरचीचे हिरवे वाटण घाला, थोडेसे परतल्यावर यात बटाटे , मीठ आणि कोथिंबीर घालून मिक्स करा व झाकण ठेवून एक वाफ आणा. पाच मिनिटांनी झाकण उघडा, आपली बटाटा भाजी तैयार !
  5. भाजी थोडी थंड झाल्यावर या भाजीचे लांबट आकाराचे रोल बनवून घ्या.
  6. ब्रेड च्या कडा कात्रीने कापुन घ्या
  7. एका बाऊल मध्ये पाणी घ्या
  8. त्यामध्ये ब्रेडची एक स्लाईज बुडवून हातावर तशीच चोकोनी दाबून त्यातील पाणी काढावे
  9. पाणी काढलेल्या या स्लाईजवर बटाट्याच्या भाजीचा तयार केलेला लांबट रोल ठेवा आणि ब्रेड दोन्ही बाजूने रोलच्या आकारात बंद करा.
  10. याप्रमाणे सर्व रोल करून घ्या आणि फ्राय पॅन वर थोडे तेल सोडून सर्व बाजूने चांगले खमंग भाजून घ्या.
  11. आणि सॉस सोबत सर्व्ह करा, ब्रेड रोल !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर