Photo of Motichoor Ladoo by Madhumati Shinde at BetterButter
1490
4
3.0(0)
0

Motichoor Ladoo

Nov-03-2018
Madhumati Shinde
20 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

  1. बेसन एक किलो, साखर एक किलो, तळण्यासाठी तेल किंवा तूप, आवश्यकतेनुसार पाणी, वेलची पूड, काजू बदाम काप,बेदाणे.

सूचना

  1. प्रथम एका भांड्यात बेसन चाळुन चांगले भिजवून घेणे भजीच्या पिठ तयार करतो तसे. आपल्याला आवडत असल्यास खायचा रंग वापरू शकता. मी चमचाभर हळद वापरली आहे. पीठ भिजवताना गुठळ्या होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. नंतर एका कढईत (शक्य असल्यास मोठीच वापरा)तेल गरम करत ठेवावे. तेल कडकडीत गरम झाले कि त्यात झारीवर वाटीभर पीठ घालून झाडाला.मी गॅस जवळ बाजुला डबा ठेवून त्याच्या आधाराने झारीचा दांडी हळूहळू आपटत मोतीचूर तेलात पाडला आहे. नंतर चार ते पाच मिनिटे शिजू द्यावे व मोदकाच्या चाळणीत छोट्या झारीने काढून घेणे. (कारण चाळणीतून अतिरिक्त तेल गळून चाळणी खालील ताटात पडते) अशाच प्रकारे सर्व पीठ वापरून मोतीचूर पाडून घेणे. नंतर एका पातेल्यात साखर बुडेल एवढे पाणी घालून एकतारी पाक करावा. गॅस बंद करावा. पातेले जमिनीवर ठेवून पाकात सर्व मोतीचूर मिसळावा वेलची पूड घालून चांगले हलवावे. आणि मिश्रण पुर्ण थंड झाल्यावरच ड्रायफ्रुटस वापरून लाडू वळावे.सजावट म्हणून तुम्ही वरून ही काजू बदाम काप बेदाणे लावून शकता.अशा प्रकारे सुंदर मोतीचूर लाडू तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर