मुख्यपृष्ठ / पाककृती / चोटी चूर्मा लाडू

Photo of Choti chruma ladu by जयश्री जोशी at BetterButter
1021
2
0.0(0)
0

चोटी चूर्मा लाडू

Nov-12-2018
जयश्री जोशी
90 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चोटी चूर्मा लाडू कृती बद्दल

हा लाडू खाण्यास छान लागतो विशेष म्हणजे वयस्कर लोक सुध्दा हा लाडू खाऊ शकतात

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 6

  1. गहू १किलो
  2. पिठी साखर १किलो
  3. चांगले तूप अर्धा किलो
  4. १ टी स्पून जायफळ पावडर
  5. मोहन घालण्यासाठी तेल
  6. १ टी स्पून मीठ

सूचना

  1. प्रथम गहू गिरणीतून रवाळ असे दळून आणणे.
  2. ते रवाळ पीठ त्यात थोडे मीठ व तेल घालून लाटता येईल इतपत पाणी घालून भिजवावे फार पाणी घालू नये.
  3. नंतर त्याची पोळी लाटावी व मोठ्या शंकरपाळी च्या आकारात कापून चांगली तुपात तळावी तळणी साठी लागेल एव्हढेच तूप कधाईत घालावे जास्त घालू नये.
  4. मग तळलेले सर्व शंकरपाळी मिक्सर मध्ये बारीक करावी व नंतर पिठाच्या चाळणीने चाळून घेणे.
  5. नंतर ते चाळ लेले पीठ एका सपाट भांड्याने मोजून घ्यावे जेव्हढे पीठ तेव्हढीच पिठीसाखर त्यात घाळणे जायफळ पूड पण घाळने व उरलेले तूप लाडू बांधता येईल इतपत त्यात घाळणें फार तूप झाल्यास लाडू चांगला होत नाही
  6. नंतर सर्व एकजीव करून लाडू वळणे छान होतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर