BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कच्च्या पपई चा हलवा

Photo of Kacchya Papai Cha Halva by Vaishali Joshi at BetterButter
0
2
0(0)
0

कच्च्या पपई चा हलवा

Nov-19-2018
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कच्च्या पपई चा हलवा कृती बद्दल

आजी कडे हा हलवा लेकि सूनां साठी खास करून बनविला जाई , जेव्हा त्या नुकत्याच लेकुरवाळ्य़ा झाल्या असत . नवजात बालकाला पुरेसा आहार मिळण्यास मदत होते . तसा एरवी पण करून खाता येतो बदल म्हणून छान लागतो .

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. कच्च्या पपई चा किस २ कप
 2. साखर ३/४ कप
 3. साजुक तूप २ चमचे
 4. साईंसकट दूध २ कप
 5. वेलची पावडर १ चमचा
 6. ड्राय फ्रूट्स आवडीनुसार
 7. खसखस २ चमचे

सूचना

 1. कढईत साजुक तूप घालून लगेच पपई चा किस घालून परता
 2. किस थोडा नरम झाल्यावर साईंसकट दूध घालून त्यात किस १० मिनिट शिजू द्या
 3. साखर टाकुन परता आणि मिश्रण थोड पाकाळले की त्यात आवडी प्रमाणे ड्राय फ्रूट्स , वेलची पावडर आणि खसखस घालून ढवळून सारखा करून घ्या
 4. ५-६ मिनिट परतत राहून गैस बंद करा आणि आवडीच्या आकाराच्या मोल्ड्स मधे घालून सेट करून घ्या . सर्व्ह करण्यास तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर