मुख्यपृष्ठ / पाककृती / गोड आंबट मसाला वांगी

Photo of Goad aambat Masala vangi by Chayya Bari at BetterButter
2125
4
0.0(0)
0

गोड आंबट मसाला वांगी

Nov-23-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोड आंबट मसाला वांगी कृती बद्दल

ओले खोबरे घालून आजीच्या हातच मसाला वांगी म्हणजे shshsh....

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. छोटी काटेरी वांगी पावशेर
  2. ओले खोबरे 1/2 वाटी
  3. जाडसर शेंगदाणे कूट 3चमचे
  4. आले लसूण पेस्ट 1चमचा
  5. जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  6. कोथिंबीर
  7. तिखट 1चमचा
  8. हळद 1/2 चमचा
  9. गरम मसाला 1 चमचा
  10. कांदा लसूण मसाला 1 चमचा
  11. धने जिरे पावडर प्रत्येकी 1/2 चमचा
  12. तेल 4 चमचे
  13. चिंचेचा कोळ 1/2 चमचा
  14. गूळ सुपारी एवढा
  15. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम ओले खोबरे भाजून कोथिंबीर घालून वाटण करा
  2. वांग्याना +आकाराचा चिरा देवून स्वच्छ धुवून पाण्यात ठेवा
  3. तेल तापवून त्यात जिरे ,मोहरी,हिंग फोडणी करा व खोबऱ्याचे वाटण परता
  4. आता परतलेले अर्धे वाटण काढून त्यात अर्धे मसाले,शेंगदाणे कूट , चिंचेचा कोळ,गूळ ,धने जिरे पावडर मिक्स करून ह्ये मिश्रण वांग्यात स्टफ्ड करा
  5. आता परतलेल्या वाटणात आले लसूण पेस्ट उर्लेले मसाले घालून परतावे आता त्यात भरलेली वांगी घालून नीट मिक्स करा
  6. आता वाटीभर उकळलेले पानी घालून एक वाफ घ्यावी
  7. मग आणखी उकळते पाणी घालून वांगी छान शिजू द्यावी मंद गॅसवर .
  8. वांगी मऊ झाली की भाजी तयार गरमागरम भाकरीबरोबर छानच

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर