BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / गोळा भात

Photo of Gola bhat by Shilpa Deshmukh at BetterButter
2
1
0(0)
0

गोळा भात

Nov-25-2018
Shilpa Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोळा भात कृती बद्दल

गोळा भात म्हणजे अगदी पूर्ण जेवणच आजी खूप छान बनवायची मी तिच्याकडून शिकले तिच्याइतकी छान चव अजूनही येत नाही पण मी प्रयत्न करते .

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • ब्लेंडींग
 • सौटेइंग
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. एक वाटी तुरीची डाळ
 2. एक वाटी बासमती तांदूळ
 3. 2 tbspतेल
 4. तिखट 1 tbsp
 5. 1 tbsहळद
 6. मीठ
 7. हिंग चिमूटभर
 8. लसूण जिरे पेस्ट 1 tbsp
 9. गरम पाणी 4-5 चमचे
 10. कोथिंबीर बारीक चिरून 2 चमचे

सूचना

 1. आधी डाळ मिक्सरमधून रवाळ फिरवून घ्या. एका बाऊलमध्ये डाळीचा भरड ,तिखट ,मीठ,हळद ,लसूण जिरे पेस्ट ,कोथिंबीर ,तेल ,हिंग एकत्र करा.
 2. गरम पाणी घालून घट्ट भिजवा .पाणीहळूहळू घाला .पातळ व्हायला नको. भरड घट्ट मळून घ्या.
 3. 2 कप पाणी उकळायला ठेवा उकळी आली कि त्यात तांदूळ धुवून घाला मिक्स करा एक चमचा तेल आणि चवीपुरतं मीठ घालून . झाकण ठेवून भात अर्धवट शिजवायचा आहे.
 4. भिजलेल्या पिठाचे गोळे बनवा.
 5. भातावर एक एक गोळा ठेवत सर्व गोळे वर ठेवा. झाकण ठेवून सिम वर शिजू द्या .हवेअसल्यास थोडा पाण्याचा भपका मारा.
 6. झाकण ठेवून 10 मिनिट शिजू द्या. शिजल्यावर गरम गरम गोळाभात मस्त मिरचीच्या तेलासोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर