एक वाटी गुळ चार,पाच वाट्या पाणी एका भांड्यात गुळ विरघळू पर्यंत गरम करून घ्यावे.नंतर ते गुळाचे पाणी दुसरे पातेल्यात गाळून घ्यावे. म्हणजे गुळातील खडे निघतील. पुन्हा गुळाचे पाणी मंद आचेवर ठेवून ओले खोबरे बारीक किसून घ्यावे. त्यातील अर्धे खोबरे बाजूला ठेवून उरलेल्या खोबरे एकदम बारीक वाटून घेणे वाटताना त्यात वेलची पूड जायफळ पूड घालावे. नंतर हे वाटण गुळाच्या पाण्यात घालावे. खसखस कोरडीच हलकीशी भाजणे व गुळाच्या पाण्यात घालावी.हे सर्व मंद आचेवर ठेवून द्यावे. नंतर गव्हाचे पीठ चवीनुसार मीठ घालून घट्ट मळून घ्यावे. पोळपाटाला पीठ लावून पातळ पोळी लाटायला घ्यावी. व शंकरपाळीच्या आकाराचे तुकडे कापावे.उकळत्या गुळाच्या पाण्यात तुप घालून पाणी उकळले कि त्यात पोळीचे तुकडे टाकावेत पाणी तुकडे टाकताना उकळते असावे म्हणजे तुकडे एकमेकांना चिकटणार नाहीत. पुन्हा गॅस मंद आचेवर ठेवून दुसरी पोळी लाटायला घ्यावी व पहिल्यासारखी कृती करावी. दहा मिनिटे शिजू द्यावे आणि सर्व्ह करतांना उरलेले खोबरे वरून टाकावे.आणि गरमागरम खावे.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा