मुख्यपृष्ठ / पाककृती / भेंडी मसाला

Photo of bhendi masala by Arya Paradkar at BetterButter
757
1
0.0(0)
0

भेंडी मसाला

Dec-02-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेंडी मसाला कृती बद्दल

भेंडी मधे अनेक प्रकारचे गुणकारी जीवन सत्वे ,आर्यन, कॅल्शियम, फायबर आहेत, तसेच कमी प्रमाणात कॅलरी असून ती पचन क्रिया व्यवस्थित राहते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो भेंडी
  2. 2 बटाटे
  3. 1 कांदा
  4. 2 टोमॅटो
  5. 1 चमचा आलं लसुण पेस्ट
  6. 1 चमचा धणे जिरे पावडर
  7. 1 चमचा तिखट
  8. 1 चमचा गरम मसाला
  9. 1/2 चमचा आमचूर पावडर
  10. मीठ चवीनुसार
  11. 1 चमचा साखर

सूचना

  1. बटाटे सोलून चिरून घेणे,भेंडी चिरून घेणे
  2. गरम पाण्यात टोमॅटो उकडून, गार पाण्यात घालून साल काढून टोमॅटोची प्युरी करणे
  3. थोड्या तेलावर थोडे मीठ घालून भेंडी परतून घ्या
  4. थोड्या तेलावर बटाट्यात थोडे मीठ घालून चांगले परतून घ्यावे
  5. परतलेली भेंडी, बटाटा बाजूला काढून ठेवणे
  6. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, हळद व हिंग घालून फोडणी करावी नंतर त्यात कांदा घालून चांगले परतून त्यात आले लसूण पेस्ट व टोमॅटो प्युरी व सर्व मसाले घालून चांगले परतून घ्यावे
  7. नंतर त्यात परतलेला बटाटा व भेंडी घालून चांगले परतून शिजवून घ्यावे, ग्रेव्ही दाट वाटल्यास थोडे पाणी घालणे
  8. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर