मुख्यपृष्ठ / पाककृती / हिवाळ्यातील खुराक डिंकाचे लाडू

Photo of Dink Ladoo by Shraddha Juwatkar at BetterButter
1483
6
0.0(0)
0

हिवाळ्यातील खुराक डिंकाचे लाडू

Dec-04-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिवाळ्यातील खुराक डिंकाचे लाडू कृती बद्दल

डिंकाचे लाडू हिवाळ्यात हमखास बनवले जातात कारण त्यात खूप मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. हे लाडू खाल्याने आपल्या शरिराला उष्मांक मिळतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. 2 वाट्या किसलेले सुके खोबरे
  2. 1 कप मूगाचे पिठ
  3. 1 कप सोयाबिन पिठ
  4. 1 वाटी खारीक पावडर
  5. 1 वाटी खाण्याचा डिंक  
  6. खसखस २ टीस्पून
  7. 2 1/2 वाट्या चिरलेला गूळ
  8. वेलची पूड व खसखस आवश्यकतेनुसार
  9. 2 वाटी साजूक तूप
  10. बदामाचे काप अर्धी वाटी

सूचना

  1. कढई मध्ये खसखस भाजून घ्यावी.नंतर खोबर्‍याचा कीस भाजावा.दोन्ही कोरड्या वस्तु भाजून झाल्यावर एका प्लेट मध्ये काढून ठेवाव्यात.
  2. नंतर त्याच कढई मध्ये तूप घालावे व तूप गरम झाले की,थोडा-थोडा डिंक मंद आचेवर टाकून व्यवस्थित तळून फुलवून घ्यावा. बदामाचे काप जरासे परतून घ्यावे.
  3. आता त्याच तुपात मुगाचे व सोयाबीनचे पीठ वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे व शेवटी राहिलेल्या तुपामध्ये खारीक पावडर भाजून घ्यावी.
  4. खोबरे व डिंक हातानेच थोडे चुरावे. आता सर्व भाजलेले साहित्यात वेलचीची पूड मिसळावी व नीट एकत्र करावे व मिश्रण तयार करावे
  5. दुसर्‍या एका पातेल्यात गूळ घ्यावा व दोनच चमचे पाणी घालावे. पातेले गॅसवर ठेवावे व सतत ढवळत रहावे. गूळ वितळून वर आला की गॅस बंद करावा.(पाक करू नये) झटपट सर्व तयार केलेले कोरडे मिश्रण त्यामध्ये घालावे व नीट हलवावे.
  6. मिश्रण कोमट असतानाच लाडू वळावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर