मुख्यपृष्ठ / पाककृती / उडीद पापड

Photo of Udid papad by Ujwala Surwade at BetterButter
4260
2
0.0(0)
0

उडीद पापड

Dec-16-2018
Ujwala Surwade
600 मिनिटे
तयारीची वेळ
300 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उडीद पापड कृती बद्दल

आमच्या कडे असे म्हणतात हिवाळ्यात मार्गशीर्ष महीन्यात उडीद पापड केल्यास सर्व कामे मार्गी लागतात .हे कितपत खर आहे माहिती नाही परंतु मी दरवर्षी ह्या महीन्यात पापड बनवतेच.कारण उन्हाळ्यात बनविलेले संपत येतात.

रेसपी टैग

 • Tossing (Mixing with a spoon / spatula)
 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • रोस्टिंग
 • ब्लेंडींग
 • सौटेइंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

 1. ३कीलो पांढरी उडीद डाळ
 2. २पँकेट रामबंधू पापड मसाला
 3. १०रूपयाचे मिरे
 4. लसूण (ऐच्छिक )
 5. पाणी
 6. तेल

सूचना

 1. उडीद डाळ पांढऱ्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यावी नंतर गिरणी वरून दळून आणावी .
 2. अडीच किलो डाळीचे पीठ बाजूला काढून त्या त रामबंधू पापड मसाला मिक्स करून .काळी मिरी मिक्सरमध्ये जाडसर फिरवून मिक्स करून ठेवावे
 3. नंतर ज्या दिवशी पापड करायचे असतील त्याच्या आदल्या रात्री साधारण ११/१२वाजता साधारण अर्धा किलो पीठ परातीत काढून त्या त मिक्सरमध्ये वाटलेला लसूण एकत्र करून पाण्याने घट्ट पीठ मळून डब्यात झाकून ठेवावे.
 4. नंतर सकाळी काम आवरून पाट्यावर तेल टाकून पीठ वरवंट्याच्या सहाय्याने कुटून नरम झाले की हाताला तेल लावून ओढून ताणून पुन्हा नरम करून लाट्या पाडाव्या
 5. मग एक एक लाटी पिठावर लाटून घरातच स्वच्छ कापडावर सुकवत ठेवून संध्याकाळी घमेलीत भरून ठेवून द्यावे.
 6. अश्या प्रकारे ३/५दिवसात थोडे थोडे पापड लाटून नंतर १०मिनिटे उन्हात वाळवून गार झाल्यावर डब्यात भरून ठेवावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर