मुख्यपृष्ठ / पाककृती / माझ ईनोव्हेशन ,रात्रीच्या कढिची खांडवि (सूरळीची वडी)

Photo of Khandvi by Varsha Deshpande at BetterButter
477
5
0.0(0)
0

माझ ईनोव्हेशन ,रात्रीच्या कढिची खांडवि (सूरळीची वडी)

Jan-02-2019
Varsha Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

माझ ईनोव्हेशन ,रात्रीच्या कढिची खांडवि (सूरळीची वडी) कृती बद्दल

काल खूप थंडी होती म्हणून रात्री जेणात कढि केली होती.ती ऊरली काय कराव याच काहीच कळेना शेवटि मनात आल खांडवि करून बघावि का ,कशी होईल असंवाटल पण सगळच छान जमून आल आणी मीच माझी पाठ थोपटली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. * कढि 2वाटि .
  2. * बेसन 1/2वाटि .
  3. * ओल खोबरा कीस ,धूवून बारीख चिरलेली कोथिंबीर चवे नूसार .
  4. * 2चमचे तेलाची फोडणी ,त्यात मोहरी ,हिरवि मीरचीचे तूकडे ,कढिपत्ता ,हिंग टाकून तयार करणे .

सूचना

  1. *कढि 2वाटि .
  2. * गाळून घेणे
  3. * त्यात 1/2वाटि बेसन मीक्स करणे . आणी गाळून घेणे .
  4. * कढि मधे हळद, अद्रक ,मीर्चि ,हिंग ,कढिपत्ता हे सगळे स्वाद असल्यामूळे ते टाकायची गरज नाही .
  5. * आणी कूकर मधे हे भांड ठेवून 3शीट्या करून घेणे
  6. * तो पर्यंत 2 ताटांना उलट्या बाजूने तेल लावून ठेवणे
  7. कूकर थंड झाला की भांडे बाहेर काढून आतील साहीत्य भराभर घोटून घेणे .
  8. * आणी तेल लावलेल्या ताटावर सराट्याने पातळ पसरवून घेणे .
  9. * आणी वरून कोथिंबीर ,खोबर टाकून लांब ,लांब पट्या कापून घेणे .आणी गूंडाळणे .
  10. * सगळ्या कापून ,गूडाळून झाल्या की प्लेट मध्ये ठेऊन वरून तेलाची ,मीर्चि ,हिंग ,कढिपत्ता टाकलेली फोडणी टाकावी .परत खोबर ,कोथिंबीर टाकून सजवाव .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर