मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्राईड ईडली

Photo of Fried Idali by Triveni Patil at BetterButter
605
2
0.0(0)
0

फ्राईड ईडली

Jan-06-2019
Triveni Patil
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्राईड ईडली कृती बद्दल

नाश्त्यासाठी ईडली बनवतो पण बऱ्याच वेळा थोड्याफार शिल्लक राहतात त्या ईडल्या फ्राय करुन खुप टेस्टी लागतात माझ्या अडीच वर्षाच्या मुलीची फेव्हरेट रेसिपी आहे ही ती या डिश ला फाय ईड्डी म्हणते.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 2

  1. १. ९/१० बाशी ईडली.
  2. २. अर्धीवाटी कांदापात बारिक चिरुन.
  3. ३. मुठभर कोथिंबीर बारिक चिरुन.
  4. ४. १. टे.स्पुन उडिद दाळ दाणे.
  5. ५. १. टि.स्पुन हळद.
  6. ६. १ टि.स्पुन लाल मिरची पावडर.
  7. ७. १ टि.स्पुन चाट मसाला.
  8. ८. १ टि.स्पुन मोहरी दाणे.
  9. ९. १ टि.स्पुन जिरं.
  10. १०.५/६ कढीपत्ता पाने.
  11. ११. चवीपुरते मीठ.
  12. १२. फोडणी साठी तेल.

सूचना

  1. १. या कृतीसाठी ईडली या बाशीच हव्यात तर या बाशी ईडली घेवुन त्यांचे चौकोनी तुकडे करून घ्या.
  2. २. गँसवर फ्रायींग पँन ठेवुन त्यात फोडणी साठी तेल टाका तेल गरम झाले की मोहरी, जिरं टाका मोहरी जिरं तडतडले की कढीपत्त्याची पाने व उडदाची दाळ घालुन परता.
  3. ३. आता यात क्रमाने हळद, लाल मिरची पावडर, चाट मसाला घालून मिक्स करा. मग तुकडे केलेल्या ईडली परतुन घ्या. ईडलीवर चवीप्रमाणे मीठ घालावे.
  4. ४. ईडली छान ब्राऊन रंग येईस्तोवर परतायची आहे, ईडली ब्राऊन झाली की त्यावर बारिक चिरलेली कांदा व कोथिंबीर घालावी.
  5. ५. तयार आहे फ्राईड ईडली, गरम गरम फ्राईड ईडली चिली साँस बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर