मुख्यपृष्ठ / पाककृती / कोर्न पालक ढोकळे

Photo of Corn spinach dhokala by seema Nadkarni at BetterButter
555
2
0.0(0)
0

कोर्न पालक ढोकळे

Feb-01-2019
seema Nadkarni
920 मिनिटे
तयारीची वेळ
13 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोर्न पालक ढोकळे कृती बद्दल

या पाक कृती मध्ये तेल, मसाले.. नसल्याने खुप च हेल्दी आहे. जी मुले पालक खात नाही त्याच्या साठी तुम्ही बनवु शकतो..

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 कप ढोकळ्या चे पीठ (तांदूळ +चण्याची डाळ +उडीद डाळ)
  2. 1/2 झुडी पालक
  3. 2-3 चमचा आले लसुण
  4. चवी पुरते मीठ
  5. 1 कप कोनॅ
  6. 1/2 कप ताक
  7. 1/4 टि स्पून हळद
  8. 2-3 चमचा कोथिंबीर मिरची पेस्ट
  9. 1-2 चमचा तेल फोडणी साठी

सूचना

  1. प्रथम ढोकळ्या चे पीठ तयार करून घ्यावे.
  2. एका पातेल्यात ताक आणि ढोकळ्या चे पीठ एकत्र करून 8-9 तास भिजत ठेवावे.
  3. पालक ची पाने स्वच्छ धुवून मिक्सर मधुन वाटून घ्यावे. कोनॅ पण शिजवून घ्यावे. बाकी सर्व तयारी करून घ्या.
  4. भिजलेल्या ढोकळ्या च्या मिश्रणात पालक ची पेस्ट, हिरवी मिरची लसुण ची पेस्ट, चवीपुरते मीठ, हळद, कोनॅ घालावे.
  5. व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
  6. एका ताटात थोडे तेल लावून त्यावर ढोकळ्या चे मिश्रण घालून घ्या.
  7. झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यावे. तयार करून सूरी ने चौरस तुकडे करून घ्यावेत.
  8. एका कढईत 2-3 चमचा तेल घालून राई हिंग ची फोडणी करून त्यात हे ढोकळे फोडणी करून घ्या.
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर व किसलेले खोबरे घालून गरम गरम सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर