बासुंदी | Basundi Recipe in Marathi

प्रेषक Anuradha Balasubramanian  |  7th Mar 2017  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Basundi by Anuradha Balasubramanian at BetterButter
बासुंदी by Anuradha Balasubramanian
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  2

  तास
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

248

0

बासुंदी

बासुंदी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Basundi Recipe in Marathi )

 • पूर्ण मलाईचे दूध - 1 1/2 लिटर
 • साखर - 1/3 कप
 • वेलदोडा पावडर - 1 टी स्पून
 • बारीक स्लाईस केलेले बदाम - 1 टेबल स्पून
 • बारीक स्लाईस केलेला पिस्ता - 1 टेबल स्पून

बासुंदी | How to make Basundi Recipe in Marathi

 1. जाड तळाच्या पॅनमध्ये दूध घालावे. ते उकळू द्यावे.
 2. ते उकळू लागल्यावर आंच कमी करावी आणि दूध अर्धे होईपर्यंत आणि गुलाबी रंग येईपर्यंत उकळत रहावे.
 3. सतत ढवळत रहावे आणि बाजूला साय चिकटणार नाही इकडे लक्ष द्यावे. याला जवळपास 50 मिनिटे ते एक तास लागेल.
 4. आता साखर घालून मंद आंचेवर आणखी 30 ते 40 मिनिटे दूध घट्ट होईपर्यंत उकळत रहावे.
 5. त्यामध्ये वेलदोडा पावडर घालून चांगले मिसळून घ्यावे आणि 10-15 मिनिटे उकळू द्यावे .
 6. स्लाईस केलेले बदाम व पिस्ता घालून सजवावे, बासुंदी रूमच्या तापमानात किंवा थंड खायला द्यावी.

My Tip:

काहीही नाही.

Reviews for Basundi Recipe in Marathi (0)