सांबार | Sambhar Recipe in Marathi

प्रेषक Manisha Goyal  |  12th Oct 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Sambhar by Manisha Goyal at BetterButter
सांबार by Manisha Goyal
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1476

0

Video for key ingredients

 • Sambhar Powder

 • How to make Idli/Dosa Batter

सांबार recipe

सांबार बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sambhar Recipe in Marathi )

 • तूरडाळ ( 30 मिनिटे भिजवलेली ) - 1 कप
 • चिरलेल्या मिश्र भाज्या - 1 कप
 • ताजा चिंचेचा लगदा - 1 टेबल स्पून
 • हळद पावडर - 1/2 टी स्पून
 • चवीनुसार मीठ
 • पाणी - 2.5 कप
 • फोडणीसाठी : 3 टेबल स्पून तेल
 • 3 - सुक्या लाल मिरच्या
 • 1 टी स्पून - मोहरी
 • 1 टी स्पून - एव्हरेस्ट हिंग
 • 12 ते 15 कढीपत्ता
 • 1 टी स्पून किसलेले आल्ले
 • 1 कप - चिरलेले टोमॅटो
 • 1 कप - चिरलेला कांदा
 • 1 टी स्पून लाल मिरची पावडर
 • 1 1/2 टेबल स्पून - सांबार मसाला
 • बारीक खवलेले नारळाचे खोबरे ( ऐच्छिक )

सांबार | How to make Sambhar Recipe in Marathi

 1. डाळ 30 मिनिटे भिजवून ठेवावी आणि स्वच्छ धुवून घ्यावी.
 2. प्रेशर कुकरमध्ये डाळ, चिरलेल्या भाज्या, मीठ, हळद पावडर व पाणी घालून मंद आचेवर 5-6 शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे.
 3. आता कढईत तेल गरम करावे. त्यात मोहरी, सुक्या लाल मिरच्या, हिंग व कढीपत्ता घालावा .
 4. कांदा व आल्ले घालून तांबूस होईपर्यंत परतावे. त्यामध्ये टोमॅटो घालावेत. ते मऊ होईपर्यंत शिजवावेत . प्रेशर कुकरमध्ये शिजवलेल्या डाळीत मिसळून घ्यावे.
 5. सांबार मसाला, मिरची पावडर, चिंचेचा पल्प घालून चांगले ढवळावे.
 6. आवश्यक घट्टपणा येईल इतपत पाणी घालावे. 10 मिनिटे शिजवावे, चांगले ढवळून घ्यावे . खवलेले नारळाचे खोबरे घालावे.
 7. वाफाळत्या राईस, इडली किंवा डोसा बरोबर गरमागरम खायला द्यावे.

My Tip:

मी भाज्या एकदम बारीक चिरून घेते , कारण माझी मुले भाज्या जर दिसून आल्या तर डाळीतून काढून टाकतात. तुम्ही मसाले तुम्हाला आवडतील ते वापरू शकता. सांबारच्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही त्यामधे जर 3-4 टेबल स्पून खोबऱ्याची चटणी मिसळली तर त्याला वेगळीच चव येते. ही पारंपरिक अस्सल पद्धत नाही. ही माझ्या माॅमची गेल्या अनेक वर्षांपासूनची सांबार बनविण्याची पद्धत आहे जी मला खूप आवडते.

Reviews for Sambhar Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo