मुख्यपृष्ठ / पाककृती / उडीद मेथ्या बॉंडे

Photo of UDID methya bonde by Chayya Bari at BetterButter
871
9
0.0(0)
0

उडीद मेथ्या बॉंडे

Dec-19-2017
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उडीद मेथ्या बॉंडे कृती बद्दल

हिवाळा स्पेशल रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उडीद डाळ १वाटी
  2. कणिक१/२ वाटी
  3. मेथ्या 2 मोठे चमचे
  4. शिळा भात १/२वाटी
  5. हिरवी मिरची आले लसूण पेस्ट २चमचे
  6. हळद १चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. हिंग १/२, चमचा
  9. तेल तळण्यासाठी
  10. दही २चमचे

सूचना

  1. उडीद डाळ रात्री भिजत टाकावी
  2. सकाळी स्वच्छ धुऊन मिक्सरवर वाटून घ्यावी
  3. मेथ्या शिजवून २,३पाण्याने स्वच्छ धुऊन घ्याव्या
  4. मेथ्या व भात मिक्सरवर बारीक करून डाळीत मिक्स करावा
  5. मग हळद मीठ हिंग हिरवी मिरची आले लसूण पेस्ट घालावी
  6. कणिक घालावी
  7. दही घालावे
  8. कोमट पाणी गरजेपुरते घालून सरसरीत करावे
  9. तेल कडक तापवून बॉंडे त्यात सोडावे
  10. भज्या पेक्षामोठे व वड्यापेक्षा लहान असावे
  11. थोडे झाले की पलटी मारून आणखी थोडे होऊ द्यावे मग मंद गॅसवर नीट तळावे
  12. नुसते किंवा दह्याच्या चटणीबरोबर गरमगरम नाश्ता छानच

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर