मुख्यपृष्ठ / पाककृती / गोडाचा शाही शिरा

Photo of Sheera by Anuradha Kuvalekar at BetterButter
1085
3
0.0(0)
0

गोडाचा शाही शिरा

Jan-13-2018
Anuradha Kuvalekar
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोडाचा शाही शिरा कृती बद्दल

महाराष्ट्रात सणासुदीला व पूजेच्या दिवशी नेवैद्य म्हणून केला जातो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ वाटी मध्यम रवा
  2. १ वाटी साखर
  3. १५-१६ भिजवलेले बदाम
  4. साजूक तूप जरुरीनुसार
  5. १ ते सव्वा वाटी दुध
  6. दिड वाटी पाणी
  7. २ चमचे केशर-वेलची सिरप / वेलची पावडर व केशर
  8. १०-१२ काजूचे तुकडे
  9. १/४ वाटी बेदाणे
  10. मीठ चिमुटभर

सूचना

  1. एका कढईत थोडेसे तूप घालून रवा खमंग भाजून घ्यावा.
  2. भाजलेल्या रव्यामध्ये चिमुटभर मीठ व १ वाटी उकळीचे पाणी घालून रवा फुलवून घ्यावा. रवा कोरडा वाटल्यास अजून थोडे पाणी घालावे.( उकळीचे पाणी घातल्याने रवा छान फुलतो.)
  3. भिजवलेले बदाम व १/२ कप दूध एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून पेस्ट करून घ्या. (६-७ तास बदाम भिजवून बदामाची पेस्ट सालासकट करावी.)
  4. तयार बदाम पेस्ट, साखर व केशर वेलची सिरप रव्यामध्ये घाला. २-३ चमचे तूप सोडा. काजूचे तुकडे व बेदाणे घालून मिश्रण ढवळून त्यावर झाकण ठेवा. मध्यम आंचेवर एक वाफ येऊ द्यावी. आवश्यकतेनुसार पुन्हा थोडे दूध व तूप घालून शिरा ढवळून एक वाफ द्या.
  5. गरम-गरम शाही शिरा सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर