मुख्यपृष्ठ / पाककृती / भरली तोंडली

Photo of BHARLI tondali by Chayya Bari at BetterButter
1094
8
0.0(0)
0

भरली तोंडली

Jan-29-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरली तोंडली कृती बद्दल

नावडती तोंडली अशी केली तर नक्कीच आवडेल

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मध्यम आकाराची तोंडली पावशेर
  2. खोबऱ्याचा किस ४चमचे
  3. तीळ भाजून कूट ३चमचे
  4. १छोटा कांदा
  5. आले पेराइतके
  6. लसूण ७,८पाकळ्या
  7. कोथिंबीर १वाटी
  8. तिखट,काला मसाला आवडीप्रमाणे
  9. हळद १/२चमचा
  10. मीठ चवीप्रमाणे
  11. जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
  12. तेल ४चमचे

सूचना

  1. प्रथम तयारीत तोंडली धुऊन उभ्या चिरा देऊन मिठाच्या पाण्यात टाकून ठेवावी
  2. तीळ भाजून कूट करावे
  3. खोबरे किस व कांदा भाजूनआले लसूण कोथिंबीर एकत्र करून मिक्सरवर वाटण करावे
  4. वाटणात तिखट मीठ हळद काळा मसाला मिक्स करावा
  5. तोंडली परत धुऊन घ्यावी
  6. मग उभ्या चिरेत वाटण भरावे फार मावत नाही
  7. तेल तापवून हिंग जिरे मोहरीची फोडणी करावी
  8. उरलेले वाटण टाकून तेल सुटेस्तोवर परतावे मग भरलेली तोंडली घालून परतून कपभर पाणी घालावे
  9. माध्यम गॅसवर शिजू द्यावे
  10. शिजत आले की गॅस मंद करावा
  11. अधूनमधून हलवावे
  12. गरजेप्रमाणे रस्सा करावा
  13. भाजी तयार वरून थोडी कोथिंबीर घालावी
  14. गरम पोळी भाकरीबरोबर मस्तच

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर