मुख्यपृष्ठ / पाककृती / भरलेली वांगी

Photo of Bharleli vangi by pranali deshmukh at BetterButter
595
5
0.0(0)
0

भरलेली वांगी

Feb-03-2018
pranali deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरलेली वांगी कृती बद्दल

वांगी बारमाही भाजी आहे त्यामुळे काहीतरी स्पायसी भाजी खायची इच्छा झाली तर भरलेली वांगी बेस्ट ऑप्शन आहे .हि वांगी मी मायक्रोवेव्हचा वापर करून बनवली त्यामुळे वांग्यांचा नैसर्गिक रंग अजिबात बदललेला नाही.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक पाव कोवळी वांगी
  2. 50 gr सुकं खोबरं
  3. 2 चमचे खसखस
  4. 2 चमचे अद्रक लसूण जिरे पेस्ट
  5. 1/4 शेंगदाणे कूट
  6. मोहरी 1/2 tbsp
  7. 1 कांदा
  8. 2चमचे धने
  9. 1/4 tbsp हिंग
  10. 2 चमचे खडा मसाला ( जायपत्री , तमालपत्र )
  11. 2 चमचे तिखट
  12. 1 चमचा हळद
  13. मीठ
  14. 2डाव तेल
  15. गरम मसाला

सूचना

  1. वांगी धुवून आणि पुसून घ्या .चाकूने मधात क्रॉस कापा .पूर्ण कापू नका .मसाला भरायला जागा करत आहोत.
  2. धने कांदा कापून तेलात भाजून घ्या .खोबरं,खसखस अशाच प्रकारे भाजा.
  3. खोबरे ,खसखस ,शेंगदाणे कूट ,तिखट ,हिंग ,मीठ एकत्र करून मिक्सरला बारीक वाटून घ्या .
  4. चिरलेल्या वांग्यात हा मसाला भरा.
  5. सर्व वांगी मसाला भरून सज्ज ठेवा.
  6. कांदा धने पेस्ट वाटून घ्या .
  7. कढईत तेल टाका तेल तापले कि मोहरी घाला ,मोहरी तडतडली कि लसूण जिरे अद्रक पेस्ट घाला .थोडी परतवले कि कांदा पेस्ट ,खडा मसाला घालून परतवा .
  8. आता तिखट ,हळद ,मीठ ,गरम मसाला घाला 2 मिनिट परतावा एक वाटी पाणी घालून मिक्स करा .
  9. हि ग्रेव्ही भरलेल्या वांग्यांवर टाका आणि मायक्रोवेव्ह मध्ये 10 मिनिट सेट करा.
  10. दहा मिनिटांनी बाहेर काढा .गरमगरम भाजी .चपातीबरोबर भाकरीबरोबर सर्व्ह करा.
  11. तुम्ही बघू शकता रंग बदललेला नाही.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर