पनीर टिक्का मसाला | Paneer Tikka Masala Recipe in Marathi

प्रेषक Razina Javed  |  28th Jul 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Paneer Tikka Masala by Razina Javed at BetterButter
पनीर टिक्का मसाला by Razina Javed
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  2

  तास
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

304

0

पनीर टिक्का मसाला recipe

पनीर टिक्का मसाला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Paneer Tikka Masala Recipe in Marathi )

 • पनीर / काॅटेज चीज - 250 ग्रॅम ( चौकोनी तुकडे केलेले )
 • कांदा - 1 ( मोठा चौकोनी चिरलेला )
 • टोमॅटो - 1 मोठा ( बिया काढलेला चौकोनी चिरलेला )
 • सिमला मिरची - 1 मोठी ( चौकोनी चिरलेली )
 • भाजलेले हरभरा पीठ - 2 टेबल स्पून
 • बांधून ठेवलेले दही - 1/4 कप
 • आल्ले लसूण पेस्ट - 1 टी स्पून
 • हळद - 1/4 टी स्पून
 • काश्मीरी लाल मिरची पावडर - 1 टी स्पून
 • धणे पावडर - 1 टी स्पून
 • काळी मिरी पावडर - 1/4 टी स्पून
 • गरम मसाला पावडर - 1 टी स्पून
 • लिंबाचा रस - 1 टी स्पून
 • चवीनुसार मीठ
 • तेल - 4 टेबल स्पून
 • कांदा - 1 मोठा ( पेस्ट )
 • आल्ले लसूण पेस्ट - 1 टी स्पून
 • जीरे - 1/2 टी स्पून
 • टोमॅटो - 1 मोठा प्युरी केलेला
 • वेलदोडे - 2
 • दालचिनी - 1 इंच
 • लवंगा - 2
 • हळद पावडर - 1/4 टी स्पून
 • काश्मीरी लाल मिरची पावडर - 1 टी स्पून
 • धणे पावडर - 1 टी स्पून
 • गरम मसाला पावडर - 1 टी स्पून
 • कसुरी मेथी - 1/2 टी स्पून
 • योगर्ट - 2 टेबल स्पून ( झटकलेले )
 • ताजी मलाई - 2 टी स्पून
 • सजविण्यासाठी - कोथिंबीर
 • चवीनुसार मीठ
 • तेल

पनीर टिक्का मसाला | How to make Paneer Tikka Masala Recipe in Marathi

 1. मैरीनेट करण्यासाठी : एका बाऊलमध्ये आल्ले लसूण पेस्ट, काश्मिरी मिरची पावडर, धणे पावडर, काळी मिरी पावडर, गरम मसाला पावडर, लिंबाचा रस आणि मीठ एकत्रीत करावे आणि चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे.
 2. उच्च आचेवर तेल गरम करावे, आंच बंद करावी आणि हळद टाकावी .
 3. आता पनीरचे तुकडे आणि चिरलेल्या भाज्यांचे तुकडे टाकून त्याना मसाला व्यवस्थित लागल्याची खात्री करावी .
 4. हे कमीत कमी 2 तास फ्रीजमध्ये ठेवावे, त्यानंतर ते बाहेर काढून त्याला रूम तापमानात येऊ द्यावे.
 5. मॅरीनेट केलेले पनीर आणि भाज्या आळीपाळीने सळईला लावाव्यात.
 6. अगोदर 200 सी उष्णता असलेल्या ओव्हनमध्ये 15-20 मिनिटे किंवा पनीर व भाज्या तांबूस होईपर्यंत ग्रील कराव्यात.
 7. रश्श्यासाठी : कढईत तेल गरम करून त्यात वेलदोडे, दालचिनी, लवंगा आणि जीरे टाकावे. तडतडायला सुरू होईपर्यंत तळावे.
 8. कांद्याची पेस्ट टाकून सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत परतावे.
 9. आता आल्ले लसूण पेस्ट घालून काही मिनिटे परतावे, त्यानंतर प्युरी केलेले टोमॅटो घालून उच्च तापमानात 1 मिनिटे शिजवावे.
 10. त्यात धणे पावडर, काश्मिरी लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला व मीठ घालावे. तेल वेगळे होईपर्यंत शिजवावे.
 11. योगर्ट घालून चांगले ढवळावे. पाणी टाकून रस्सा घट्ट व्हायला सुरुवात होईपर्यंत 5 मिनिटे शिजवावे. सुसंगती जुळवून घ्यावी.
 12. ताजी मलाई व कसुरी मेथी टाकून चांगले ढवळावे. हळु हळु पनीर टिक्का आणि भाज्या मिसळाव्यात आणि हलकेच ढवळावे .
 13. कोथिंबीरीने सजवून गरमागरम खायला द्यावे.

My Tip:

काहीही नाही.

Reviews for Paneer Tikka Masala Recipe in Marathi (0)