मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर टिक्का मसाला

Photo of Panir tikka masala by pranali deshmukh at BetterButter
846
4
0.0(0)
0

पनीर टिक्का मसाला

Feb-07-2018
pranali deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर टिक्का मसाला कृती बद्दल

चटपटीत भाजी खायची इच्छा झाली तर मस्त पनीर टिक्का मसाला करावा.चटक मटक टेस्ट हेच ह्या भाजीचं वैशिठ्य आहे .मी ह्या भाजीसाठी मलाई पनीरचा वापर केला जे मी घरीच बनवले .एक लिटर फुल क्रीम दुधापासून 200-250 गर.पनीर तयार झाला 100% शुद्ध शंका करायचं कारणच नाही .नेहमीप्रमाणे आजही त्याला विचारलं दादा पनीर फ्रेश आहे ना ???उद्यापर्यंत टिकेल ना ??? त्यांनी हो म्हणून ,माझ्या शंकेचं निरसन केलं . मी दुसऱ्यादिवशी फ्रीजमधून पनीर बाहेर काढलं ...तर ते पिवळसर दिसत होत आणि आंबट वास पण येत होता ....इतका राग आला ना ! पनीरचा बेत कॅन्सल , मुळीच नाही तीन पाव दूध आणले होते . बस मग काय गरम करायला ठेवलं उकळी आल्यावर एक लिंबूचा रस टाकला क्षणातच दूध फाटलं पाणी वेगळं झालं . एका सुती कापडात काढलं दोन तीन वेळा वरून थंड पाणी टाकलं म्हणजे आंबटपणा निघून जाईल .कापडात श्रीखंडाच्या चाक्यासारखं अर्धा तास बांधून ठेवलं .पाणी पूर्ण झरुन गेलं .मग एक वजनदार खलबत्ता त्याच्यावर ठेवला वीस मिनिटांनी काढून घेतला .झालं कि पनीर तयार .... . पनीर स्टोर करायचं असेल तर दुधाची मलाई काढून घ्यावी .जास्त दिवस टिकते पण आपल्यलाला घरच्यांसाठी लगेच दोन तीन दिवसात संपवायचं असेल तर असच मलाई पनीर बनवता येईल याची क्वांटिटी जास्त होते आणि चव अगदी 100% सॉफ्ट ...100% लाजवाब ....100% शुद्धतेची खात्री .

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • किड्स रेसिपीज
  • पंजाबी
  • शॅलो  फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पनीर 200gr.
  2. शिमला मिरची 1
  3. कांदे 2
  4. टोमॅटो 2
  5. फ्रेश क्रीम 1/4 कप
  6. 1 तेजपान
  7. 4 मिरे
  8. 2 छोटी इलायची
  9. दालचिनी 1/2 इंच
  10. अद्रक लसूण पेस्ट 1 tbsp
  11. काश्मिरी मिरची पावडर 2 tbsp
  12. काजू 4
  13. हळद 1tbsp
  14. मीठ
  15. कॉर्न फ्लोर 2 tbsp
  16. दही घट्ट बांधलेलं 4 tbsp
  17. लिंबू रस 1 tbsp
  18. गरम मसाला / चाट मसाला 1 tbsp
  19. तेल 3 डाव

सूचना

  1. आदल्या दिवशी एक लिटर फुलक्रीम दूध तापवायला ठेवले .उकळीयेताच 1 लिंबाचा रस पिळला चमच्याने सारखे हलवले .दूधपूर्ण फाटल्यावर गॅस बंद केला.
  2. पाणी झरुन घेतले .चोथा एका सुती कापडात श्रीखंडाच्या चक्यासारखा बांधून 20-30 मिनिट टांगून ठेवला .
  3. कापड सोडल्यावर पाणी पूर्ण निघालेले होते .एका खोल ट्रेमध्ये ठेवून वरती वजनदार खलबत्ता ठेवला .
  4. दहा मिनिटांनी फ्रिजरमध्ये ठेवले .अगदी सॉफ्ट मलाई पनीर तयार झाले.
  5. पनीरचे 1 इंचाचे चौकोनी तुकडे करा.शिमला मिरची आणि 1 कांद्याचे पण तसेच तुकडे करा.
  6. एका बाऊलमध्ये दही ,कोर्नफ्लोर ,तिखट,हळद ,मसाला मीठ ,लिंबू रस ,तेल ,तिखट घेऊन मिक्स करा त्यात वरील तुकडे घालून मिक्स करा .प्रत्येक तुकड्याला मिश्रण लागायला हवं.
  7. मॅरीनेट केल्यावर 30 मिनिट फ्रिजमध्ये ठेवा .तीस मिनिटांनी थोड्या तेलात शालोफ्राय करा.
  8. ग्रेव्हीसाठी कांदा लांब चिरून तळून ,टोमॅटो बॉईल करून ,काजू ऍड करून वाटण काढा.
  9. कढईत तेल टाका तेजपान ,मिरे ,इलायची ,दालचिनी टाका .सर्व मसाले ब्राऊन झाल्यावर बाहेर काढून घ्या.अद्रक लसूण पेस्ट , ग्राइंड केलेला वाटण टाका .तेलसुटेपर्यंत परता.
  10. तिखट ,हळद ,मीठ ,गरम मसाला टाका .टिक्काऍड करा .मिक्सकरा.
  11. 1 वाटी पाणी आणि फ्रेश क्रीम ऍड करा.1 tbsp .साखर घाला.मिक्स करा .पाचमिनिटांनी गॅस बंद करा.
  12. तंदुरी किंवा नान ,नाहीतर फुलक्यांबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर