मुख्यपृष्ठ / पाककृती / इडली चटणी सांबार

Photo of Edali Chatani Sambar by Archana Lokhande at BetterButter
1885
4
0.0(0)
0

इडली चटणी सांबार

Feb-16-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इडली चटणी सांबार कृती बद्दल

इडली चटणी सांबर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • साऊथ इंडियन
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदूळ ३ वाटी
  2. उडीद डाळ १ वाटी
  3. मेथी दाणे १०
  4. भिजवलेले पोहे १/२ वाटी
  5. मीठ
  6. चटणी साठी
  7. शेंगदाणे १ वाटी
  8. डाळे १ वाटी
  9. खोबर्याचे काप १ वाटी
  10. हिरवी मिरची
  11. कोथिंबिर
  12. आल
  13. लसूण
  14. कडीपत्ता
  15. मोहरी
  16. हिंग
  17. मीठ
  18. तेल
  19. सांबर
  20. तुर डाळ एक वाटी
  21. मसूर आणि हरभरा डाळ पाव वाटी
  22. दोन कांदा
  23. एक टोमॅटो
  24. शेवग्याच्या शेंगा १-२
  25. दुधी एक वाटी
  26. पाणी
  27. आल लसूण पेस्ट
  28. मोहरी
  29. कडीपत्ता
  30. हिंग
  31. हळद
  32. लाल तिखट
  33. सांबर मसाला

सूचना

  1. तांदूळ, उडीद डाळ, मेथी दाणे ५-६ तास भिजत ठेवले.
  2. नंतर सहा तासाने मिक्सरवर भिजवलेले अर्धे तांदूळ वाटून बाजूला ठेवून, उरलेल्या तांदळात अर्धी वाटी भिजवलेले पोहे घालून वाटून घेतला आणि मिक्स करून रात्रभर तसाच ठेवून दिला.
  3. डाळे, शेंगदाणे आणि खोबर्याचे काप रात्रभर पाण्यात भिजत घालून ठेवले.
  4. सकाळी इडली पात्राला तेल लावून भिजलेल्या पिठात मीठ घालून इडली करण्यास ठेवावी.
  5. चटणीसाठी भिजवलेले डाळे, शेंगदाणे, खोबरे, हिरवी मिरची, कोथिंबिर, लसूण, थोडे आल एकत्र वाटून घेऊन एका भांड्यात काढले आणि वरून तेलात हिंग, कडीपत्ता ,मोहरीची फोडणी आणि मीठ घालून मिक्स करून घेतले.
  6. आता सांबरसाठी तुरडाळ, हरभरा आणि मसूर डाळ धुवून कुकरच्या भांड्यात घेऊन त्यात पाणी, एक कांदा, एक टोमँटो, शेवग्याच्या शेंगा, दुधी भोपळा अजून काही तुमच्या आवडीच्या भाज्या घालून कुकरच्या तीन शिट्ट्या घेऊन बंद करा. कुकर थंड झाल्यावर सर्व छान मिक्स करून घेतले.
  7. नंतर कढईत दोन चमचे तेल घालून त्यात एक कापलेला कांदा आणि आल लसूण पेस्ट टाकून परतून घेऊन त्यात हळद, लाल तिखट, सांबर मसाला घालून परतून शिजवलेली डाळ आणि मीठ घालून मिक्स करून पाच मिनीटे उकळून घ्या.
  8. नंतर तडक्यासाठी कढईत कडीपत्ता, मोहरी, हिंग आणि लाल मिरची घालून छान तडतडले की सांबरवर घालून मिक्स करा.
  9. आता आपली इडली सुद्धा झाली आहे तर सर्व्हिग डिशमध्ये तयार इडली ,चटणी आणि सांबर ठेवून डिश सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर